प्रातिनिधिक फोटो
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : देशात लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाविरुद्ध (Coronavirus) लढाई सुरू आहे. यात लसीकरण (Corona Vaccine) हे कोविड महामारीविरोधात मोठं शस्त्र ठरलं आहे. या मोहिमेत देश लवकरच एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचणार आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत देशात कोरोना लस घेणाऱ्यांची संख्या 100 कोटींचा आकडा पार करेल. आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी संध्याकाळपर्यंत देशात 97.62 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. शनिवारी 38 लाख डोस देण्यात आले. यामुळं भारत (India) एक नव्या इतिहासाच्या जवळ पोहोचला आहे. मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाल्यापासून एकूण 39,25,87,450 लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, 11,01,73,456 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. मंत्रालयानं सांगितलं की, आतापर्यंत देशातील एकूण 69,45,87,576 लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय आणि 28,17,04,770 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. मंत्रालयानं म्हटलंय की शनिवारी देशातील कोविड -19 लसीकरणानं 97.62 कोटींचा आकडा पार केला. हे वाचा - Flipkart Big Diwali Sale ला आजपासून सुरुवात! या प्रोडक्ट्सवर मिळेल 75-80% Discount भारतात सध्या ही लस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कोविडवरील लसीकरणात 100 कोटींचा टप्पा गाठल्याच्या अनुषंगानं गाणं रिलीज केलं. लसीकरणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी अभियान राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, पुढील आठवड्यात आम्ही 100 कोटी लसीकरणाच्या आकड्यापर्यंत पोहोचू. ते म्हणाले, ‘लस विकसित करण्यासाठी साधारणपणे पाच ते दहा वर्षे लागतात.’ मात्र, आम्ही लस तयार करण्यासाठी तातडीनं कच्चा माल उपलब्ध करून देण्यापासून ते तयार झालेली लस केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी तत्काळ व्यवस्था केली. सरकारने 100 कोटी लसीकरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गाणं रिलीज देशातील 100 कोटी लोकांच्या कोविडविरोधी लसीकरणाच्या लक्ष्याकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नांवर एका गाणं तयार केलं आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि हरदीप सिंग पुरी यांनी शनिवारी संयुक्तपणे भारताच्या लसीकरण मोहिमेवर असलेलं या गाण्याची चित्रफीत (Video Song) रिलीज केली. गायक कैलाश खेर यांनी हे गाणं गायलं आहे. गाणं रिलीज करताना आरोग्य मंत्री मांडवीया यांनी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कामगारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हे वाचा - कंगाल पाकिस्तानला मोठा झटका! IMF च्या या निर्णयामुळे इम्रान खान सरकारला चीनसमोर पसरावे लागणार हात? कोरोनाच्या लढाईत जागतिक बँकेनेही केलं भारताचं कौतुक जागतिक बँकेचे (World Bank) अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी कोविड -19 साथीविरूद्ध (pandemic) यशस्वी लसीकरण कार्यक्रम राबवल्याबद्दल भारताचं अभिनंदन केलंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी लस उत्पादन आणि वितरणाच्या आंतरराष्ट्रीय भूमिकेबद्दल भारताचे आभार मानले. सीतारामन यांच्याशी येथे झालेल्या भेटीदरम्यान, मालपास यांनी वॉशिंग्टनस्थित आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि बहुपक्षीय गुंतवणूक हमी एजन्सीच्या आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासह जागतिक बँक समूहाच्या सर्व घटक संस्थांमध्ये भारताविषयी वचनबद्ध असल्याचं म्हटलं. जागतिक बँकेनं एक निवेदन जारी करून म्हटलंय की, त्यांनी हवामान बदलासंबंधीच्या भारताच्या प्रयत्नांवर चर्चा केली.