JOIN US
मराठी बातम्या / करिअर / बाबो! रोज फक्त तीन तास काम अन् मिळते तब्बल सव्वा लाख रुपये सॅलरी; 'या' भन्नाट जॉबविषयी ऐकलंय का?

बाबो! रोज फक्त तीन तास काम अन् मिळते तब्बल सव्वा लाख रुपये सॅलरी; 'या' भन्नाट जॉबविषयी ऐकलंय का?

आज आम्ही यापैकीच एका अशा नोकरीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत जी आहे तर सोपी आणि तुम्हाला भरघोस पैसेही देईल. कोणी आहे ही नोकरी बघूया.

जाहिरात

'या' भन्नाट जॉबविषयी ऐकलंय का?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जून: आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की अशी नोकरी मिळावी, जी सोपी असेल आणि त्यासाठी त्यात भरपूर पैसे मिळतील. पण, बहुतेक लोकांच्या मनाची ही इच्छा पूर्ण होत नाही. याचं कारण म्हणजे भरघोस पगार मिळवणाऱ्या लोकांवर कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या खूप जास्त असतात. पण, जगात अशा काही नोकर्‍या आहेत, ज्यामध्ये कमी मेहनत आणि भरपूर पैसा आहे. आज आम्ही यापैकीच एका अशा नोकरीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत जी आहे तर सोपी आणि तुम्हाला भरघोस पैसेही देईल. कोणी आहे हि नोकरी बघूया. ही अतिशय दुर्मिळ अशी नोकरी आहे आणि बहुतेक लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नाही. असंच एक काम म्हणजे घोड्यांचे केस कापणे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही देशांमध्ये हे काम करणारे प्रशिक्षित लोक एका घोड्याचे केस कापण्यासाठी तब्बल 12,000 रुपये घेतात. 8वी-10वी पास उमेदवारांनो, इंडियन नेव्हीमध्ये जॉब हवाय ना? अवघ्या 4 दिवसांवर आली लास्ट डेट; ही घ्या Apply Link डेली मेलच्या एका बातमीनुसार, दुबई, सौदी अरेबिया, कतार, इराण आणि कुवेत सारख्या देशांमध्ये व्यावसायिक घोडेपालकांना मोठी मागणी आहे. घोड्यांना सुंदर बनवण्यासाठी, त्यांचे केस व्यवस्थित कापले जातात. प्रत्येकजण हे काम करत नाही. घोड्याचे हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करणाऱ्यांची कमतरता आहे. हेच कारण आहे की काही देशांमध्ये घोड्याचे केस कापण्यासाठी फक्त $150 प्रति तास उपलब्ध आहेत. घोड्याचे केस कापून त्याला अप्रतिम लुक देण्यासाठी फक्त एक तास लागतो. ट्रेंड हेअर ड्रेसर दिवसाला 10 घोड्यांचे केस कापतो. अशा प्रकारे तो एका दिवसात 1.20 लाख रुपयांपर्यंत कमावतो. ना कोणती परीक्षा ना कोणती टेस्ट थेट मिळेल 60,000 रुपये सॅलरी; ‘या’ महापालिकेत बंपर ओपनिंग्स इतके पैसे कशाला? अनेक देशांमध्ये चांगले घोडे असणे ही अभिमानाची बाब आहे. दुबई, सौदी अरेबिया, कतार, इराण आणि कुवेतसह अनेक देशांमध्ये घोड्यांच्या शर्यती आणि घोडे शो होतात. घोड्याच्या शोमध्ये, घोड्याची उंची आणि ताकद सोबत, त्याचे सौंदर्य देखील त्याला जिंकण्यासाठी खूप महत्त्व देते. म्हणूनच घोडे सजवले जातात. घोड्याच्या केसांना देखील एक सुंदर आकार दिला जातो, विशेषतः शेपटी आणि मानेचे केस. नीटनेटके कापलेले केस घोड्याच्या सौंदर्यात भर घालतात. म्हणूनच ट्रेंड हॉर्स हेअर ड्रेसर्स रोज लाखो रुपये कमावतात. मग तुम्ही आहात का रेडी हे काम करायला?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या