JOIN US
मराठी बातम्या / करिअर / शालेय जीवनात मुलींपेक्षा मुलांशी शारीरिक छळ होण्याचा धोका अधिक; UNESCOच्या रिपोर्टमध्ये धक्कदायक माहिती

शालेय जीवनात मुलींपेक्षा मुलांशी शारीरिक छळ होण्याचा धोका अधिक; UNESCOच्या रिपोर्टमध्ये धक्कदायक माहिती

तब्बल 130 देशांमधून विविध प्रकारच्या प्रश्नांवर डेटा गोळा करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये (UNESCO Report for School children) अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

जाहिरात

प्रातिनिधिक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 एप्रिल: शाळेत असताना नेहमीच शिक्षकांकडून, पालकांकडून मुलं आणि आणि मुली अशी तुलना (Comparison of girls and boys in school) होत असते. काही गोष्टींमध्ये मुली पुढे असतात तर काही गोष्टींमध्ये मुलं पुढे असतात. शिक्षणाच्या बाबतीत मुली आणि मुलं हे तुलनाही होत आली आहे. बोर्डाच्या परीक्षांच्या निकालात मुलींनी बाजी मारली की मुलांनी हे बघण्यासाठी सर्वजण आतुर असतात. मात्र यावरच युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) नं एक अहवाल तयार केला आहे. ‘ग्लोबल एज्युकेशन रिपोर्ट’ (Global Education Report) असं या रिपोर्टचं नाव आहे. यामध्ये तब्बल 130 देशांमधून विविध प्रकारच्या प्रश्नांवर डेटा गोळा करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये (UNESCO Report for School children) अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. IT क्षेत्रात मोठी नोकरी हवीये? मग तुमच्याकडे ‘हे’ स्किल्स आहे ना? लगेच करा चेक 130 देशांमध्ये प्राथमिक वर्ग पुन्हात शिकण्याची शक्यता मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त आहेत. तसंच प्राथमिक आणि माध्यमिक शालेय वयाची सुमारे 1.32 दशलक्ष मुले शाळाबाह्य आहेत असं ‘लीव्ह नो चाइल्ड बिहाइंड: ग्लोबल रिपोर्ट ऑन बॉइज’ डिसेंगेजमेंट फ्रॉम एज्युकेशन’ (‘Leave no child behind: Global report on boys’ disengagement from education’) या शीर्षकाच्या अहवालात म्हंटलं आहे. या रिपोर्टनुसार, मुलींपेक्षा मुलांमध्ये शारीरिक छळ होण्याचा धोका जास्त असतो असंही सांगण्यात आलं आहे. त्यात म्हटले आहे की 130 देशांमध्ये, मुलींपेक्षा मुलं प्राथमिक शाळेत एकाच वर्गात पुन्हा शिक्षण घेतात. ही आकडेवारी त्यांच्या शाळेतील प्रगतीचा दर कमी असल्याचे दर्शवते. 57 देशांच्या आकडेवारीनुसार, 10 वर्षे वयोगटातील मुलं वाचन क्षमतेच्या बाबतीत मुलींपेक्षा खूपच मागे आहेत. माध्यमिक स्तरावर किशोरवयीन मुले मुलींच्या तुलनेत मागे आहेत असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. खूशखबर! आता निकालानंतर केवळ 180 दिवसांत मिळणार डिग्री; UGCचे विद्यापीठांना आदेश “मुली कधीच शाळेत न जाण्याची शक्यता साधारणतः अधिक असते, परंतु अनेक देशांमध्ये मुलं उच्च वर्गात जाऊ शकत नाहीत आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत,” असा धक्कदायक खुलासा करण्यात आला आहे. सध्या 13 कोटी 20 लाख मुलं शाळेपासून दूर आहेत असंही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. या अहवालात कठोर शिस्त, शारीरिक शिक्षा, लैंगिक नियम, गरिबी आणि काम करण्याची गरज ही मुले शिक्षणापासून दूर जाण्याची कारणे नमूद केली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या