JOIN US
मराठी बातम्या / करिअर / कुठेच नोकरी मिळाली म्हणून त्याने चक्क स्कूटरवरच टाकले फास्टफूड दुकान, VIDEO

कुठेच नोकरी मिळाली म्हणून त्याने चक्क स्कूटरवरच टाकले फास्टफूड दुकान, VIDEO

नोकरी मिळत नव्हती म्हणून एका तरुणाने स्कूटरवरच फास्टफूडचे दुकान टाकले.

जाहिरात

स्कूटरवर फास्टफूडचे दुकान

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पवन सिंह कुंवर, प्रतिनिधी हल्द्वानी, 24 मार्च : शिक्षण झाल्यावर अनेकांना नोकरी मिळत नाही. मग काही जण अनेक प्रयत्न करुनही नोकरी मिळाली नाही म्हणून व्यवसाय सुरू करतात. तसेच या व्यवसायात यशस्वी होऊन दाखवतात. असाच एका तरुणाने नोकरी न मिळाल्यानंतर चक्क स्टुटरवर फास्टफूडचे दुकान टाकले. मुकुल सक्सेना असे या तरुणाचे नाव आहे. उत्तराखंडच्या हल्दवानी येथील रहिवासी असलेल्या मुकुल सक्सेना याने स्कूटरवरच फास्टफूडचे दुकान टाकले आहे. हे 0दुकान उघडण्यासाठी अनेक साधनांची गरज असली तरी या तरुणाने संपूर्ण दुकान स्कूटरवरच उघडले आहे. नैनिताल रोडवरील सौरभ हॉटेलजवळ त्याची फूड स्कूटर आहे. मुकुल संध्याकाळी इथे येतो आणि ग्राहकांना स्वादिष्ट फास्ट फूड विकतो. बेरोजगारीमुळे स्वयंरोजगार सुरू केल्याचे मुकुल सक्सेना याने सांगितले. फूड व्हॅन किंवा इतर स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. मात्र, मग स्कूटरवर फास्ट फूडचे दुकान का काढू नये, असा विचार त्याने केला. त्यानंतर त्याने एक स्कूटर अशा प्रकारे मॉडिफाय केली की, त्याच्यावर त्याने फास्टफूडचे दुकान सुरू केले.

त्याने पुढे सांगितले की, मी एका वर्षापासून येथे स्कूटरवर फास्ट फूडचे दुकान सुरू केले आहे. या स्कूटरवरील फास्ट फूडच्या दुकानात तो मोमोज, बर्गर, रेड सॉस पास्ता आणि व्हाईट सॉस पास्ता विकतो. स्कूटरवर फास्ट फूडचे दुकान पाहून लोकांना आनंद होतो. त्यांना आपण बनवलेले सगळे फास्ट फूड खायला आवडते आणि हल्द्वानी शहरातील लोकांचे खूप प्रेमही मिळत आहे, असे त्याने सांगितले. मर्सिडीज कारच्या किंमतीएवढी बैलाची किंमत, ऐकून तुमचे डोळे विस्फारतील PHOTOS मुकुल सक्सेना या तरुणाने सांगितले की, बेरोजगारीमुळे त्याने हा छोटासा व्यवसाय सुरू केला आणि आज त्याला भरपूर नफा मिळत आहे. तो दररोज एक हजाराच्या वर विक्री करतो. कुठेही नोकरी मिळत नसताना मी हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. आज मी माझा व्यवसाय करून स्वत:ला स्वावलंबी बनत असल्याची भावना त्याने व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या