याबाबत गीर गौजतन संस्थेचे मालक रमेशभाोई रुपारेलिया म्हणाले, 'हा राजवाडी नंदी 42 लाख रुपयांना विकत घेतला आहे. खरं तर ही माझी गुंतवणूक आहे. गिर गौ जातन या संस्थेच्या माध्यमातून सुमारे 100 कुटुंबांना रोजगार मिळत आहे. मात्र, हा नंदीबैल घेण्याचे कारण म्हणजे या संस्थेच्या 250 गायी भविष्यात उत्कृष्ट वासरे निर्माण करतील. मला विश्वास आहे की, मला पाच वर्षांत माझ्या गुंतवणुकीच्या 10 पट परतावा मिळेल, असेही ते म्हणाले.
गिर गौ जातन संस्थेचे मालक रमेशभाई यांनी या संस्थेसाठी 1100 गायींचा कळप तयार करण्याची योजना आखली आहे. या नंदीच्या माध्यमातून गायींच्या उत्पादनात वासराची निर्मिती केल्यास त्याची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहून ते अधिक दूध देते. यासोबतच या नंदीपासून जन्माला येणाऱ्या वासरालाही भविष्यात नंदी बनवता येईल.