JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Toughest Exam in India: 'या' आहेत देशातील सर्वात कठीण परीक्षा; लाखो विद्यार्थी देतात पण काहीच करतात क्रॅक

Toughest Exam in India: 'या' आहेत देशातील सर्वात कठीण परीक्षा; लाखो विद्यार्थी देतात पण काहीच करतात क्रॅक

या अशा परीक्षा आहेत ज्यांचं फक्त नाव घेतलं तरी विद्यार्थी काही क्षणांसाठी घाबरतात. चला तर जाणून घेऊया अशा परीक्षांबद्दल.

जाहिरात

देशातील सर्वात कठीण परीक्षा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 मे: बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक उमेदवार सरकारी नोकरीसाठी तयारी करतात, तर अनेक तरुण उच्च शिक्षणासाठी तयारी करतात. पण सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा उत्तीर्ण होणे फार कठीण असतं. लेखी परीक्षेसोबतच उमेदवारांना मुलाखतही द्यावी लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही परीक्षांबद्दल सांगणार आहोत ज्या जगात अत्यंत कठीण मानल्या जातात. या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवारांना खूप मेहनत करावी लागते, परंतु असे अनेक उमेदवार आहेत जे कठोर परिश्रम करूनही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. या अशा परीक्षा आहेत ज्यांचं फक्त नाव घेतलं तरी विद्यार्थी काही क्षणांसाठी घाबरतात. चला तर जाणून घेऊया अशा परीक्षांबद्दल. जॉबसाठी एकही परीक्षा नाही थेट होणार मुलाखत, मुंबई विमानतळ इथे तब्बल 480 जागांसाठी भरतीची घोषणा UPSC नागरी सेवा परीक्षा (UPSC CSE) केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी प्रशासकीय सेवेसाठी देशात परीक्षा घेते. ज्याला नागरी सेवा परीक्षा म्हणतात. नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. त्यासाठी लोक रात्रंदिवस एक करून तयारी करतात. पण काही लोकच यशस्वी होतात. UPSC नागरी सेवा परीक्षेद्वारे IAS, IPS, IFS आणि IRS सारख्या पदांवर भरती केली जाते.

NDA परीक्षा नॅशनल डिफेन्स अकादमीची परीक्षा ही सशस्त्र दलात प्रवेश घेण्यासाठी सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. ते बारावीनंतर या परीक्षेला बसतात. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असते. ज्याचे आयोजन UPSC द्वारे केले जाते. यानंतर एसएसबी मुलाखत आहे. ज्यामध्ये वैयक्तिक मुलाखत, गट चर्चा आणि फिटनेस चाचणी इ. सर्व फेऱ्या पार केल्यानंतर भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलात अधिकारी होतो. या परीक्षेसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. BMC MGCM Recruitment: महिन्याचा तब्बल 1,00,000 रुपये पगार; मुंबई महापालिकेत ‘या’ पदांसाठी ओपनिंग्स; असा करा अर्ज GATE परीक्षा अभियांत्रिकी पदवीधर GATE परीक्षेत बसू शकतात. GATE परीक्षेचे पूर्ण रूप म्हणजे अभियांत्रिकीतील पदवीधर अभियोग्यता चाचणी. याशिवाय कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे पदव्युत्तर विद्यार्थीही GATE परीक्षा देऊ शकतात. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या लोकांना कंपन्या थेट कामावर घेतात. SSC CHSL Recruitment: 12वी पास उमेदवारांसाठी तब्बल 1600 जागांसाठी भरतीची घोषणा; लगेच करा अप्लाय IIT JEE परीक्षा देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. बारावीनंतर तुम्ही या परीक्षेला बसू शकता. IPS Success Story: 15 महिन्यांत तब्बल 16 दहशतवाद्यांना ठोकलं; AK-47 घेऊन आसामच्या जंगलात फिरतात या दबंग IPS IES परीक्षा नागरी सेवा परीक्षेप्रमाणेच भारतीय अभियांत्रिकी सेवा देखील आहे. ही देखील देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. यामध्ये चार फेऱ्या होतात. लाखो लोक फॉर्म भरतात पण मोजक्याच लोकांची निवड होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या