ऑनलाईन
नवी दिल्ली, 19 एप्रिल : सध्या आपण आपल्या आजूबाजूला बघितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा दिसत आहे. या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करून दाखवण्याचा दबाब प्रत्येकावर आहे. अशातच तांत्रिक परिणामांच्या सार्वत्रिकीकरणाच्या दिशेने सतत पडणाऱ्या पावलांमुळे कामाच्या ठिकाणांमध्ये आणि कौशल्यांच्या आवश्यकतेमध्ये सतत बदल होत आहे. या बदलांमध्ये मशीन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटिलिजन्स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), रोबोटिक्स, व्हर्च्युअल आणि रिमोट वर्क, कॉग्निटिव्ह आणि क्लाउड कॉम्प्युटिंग इत्यादींचा समावेश आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये उदयोन्मुख नवकल्पनांमुळे नवीन ट्रेंड आणि नोकरी सुरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांमध्ये वाढ झाली आहे. स्पर्धेत आणि वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येकाकडे काही स्कील्स असणं गरजेचं आहे. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
लोकांची जीवनशैली, कार्यपद्धती आणि कामाच्या ठिकाणी सतत नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि त्यात तत्काळ बदलही होत आहेत. तंत्रज्ञानावर जास्त प्रमाणात अवलंबून राहिल्यामुळे सध्या लेबर मार्केटमध्ये स्कील्स गॅप वाढत आहे. ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी असलेल्या करिअर-टेक प्लॅटफॉर्म इंटर्नशालाचे संस्थापक आणि सीईओ सर्वेश अग्रवाल यांनी काही स्कील्सची यादी शेअर केली आहे. हे स्कील्स नवोदितांना प्रगती साधण्याच्या प्रक्रियेमध्ये उपयुक्त ठरतील. 1. मशिन लर्निंग: लवचिकता, परवडण्याची क्षमता आणि सोयीमुळे मशीन लर्निंगमधील ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रमात वाढ होत आहे. मशीन लर्निंगसारख्या कौशल्यांच्या संपादनामुळे व्यक्तीची व्यावसायिक कारकीर्द वाढण्याची शक्यता वाढते. कारण बर्याच कंपन्यांना त्यांची कामं जलद आणि कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी त्यांचे प्रोग्राम्स, अद्ययावत आणि सुधारित करण्याची गरज भासते. 2. डिजिटल मार्केटिंग: डिजिटल मार्केटिंगच्या कौशल्याला विविध ब्रँड आणि कंपन्यांमध्ये सर्वाधिक मागणी होत आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये कुशल असलेली व्यक्ती कंपन्यांना ट्रेंड शोधण्यात आणि चांगल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी विश्लेषण करण्यास मदत करते. जवळजवळ प्रत्येक कंपनी डिजिटल डोमेनकडे वळली असल्याने डिजिटल मार्केटिंग शिकलेल्यांना नोकरी मिळण्याची व्याप्ती वाढली आहे. हेही वाचा - Strong Woman : सशक्त स्त्रीमध्ये असतात या 6 गोष्टी; तुम्ही स्वतःला किती नंबर द्याल 3. वेब डेव्हलपमेंट: इंटरनेटच्या विस्तारामुळे डिजिटल जगामध्ये मोठा बदल झाला आहे. परिणामी वेब डेव्हलपमेंटचं ज्ञान असलेल्या तज्ज्ञांची गरज वाढली आहे. वेब डेव्हलपमेंट हे व्यवसायांसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांपैकी सर्वांत जास्त मागणी असलेलं कौशल्य आहे. वापरकर्त्यांना अनुकूल आणि आकर्षक वेबसाइट तयार करण्यासाठी कंपन्या कुशल वेब डिझायनर नियुक्त करतात. वेब डेव्हलपर नसतील तर कंपन्यांना स्क्वेअरस्पेस किंवा वर्डप्रेस टेम्प्लेटसारख्या ड्रॅग-अँड-ड्रॉप वेब बिल्डर्सचा वापर करावा लागतो. यामुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचू शकतो. ऑनलाइन कोर्सेसद्वारे अगदी सहजपणे वेब डेव्हलपमेंट शिकता येतं. व्यावसायिक करिअरच्या प्रगतीसाठी ते फायदेशीर ठरत आहे. 4. पायथॉन: पायथॉन ही आजकाल सर्वात लोकप्रिय प्रोग्रॅमिंग भाषांपैकी एक आहे. जवळजवळ प्रत्येक कंपनीमध्ये पायथॉन डेव्हलपर्सला प्रचंड मागणी आहे. ही भाषा सहसा डेटा विश्लेषण आणि वेब डेव्हलपमेंट कामांसाठी वापरली जाते. त्यामुळे पायथॉनचं ज्ञान असणं हे, व्यावसायिक वातावरणात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी 21 व्या शतकातील सर्वात आवश्यक कौशल्यांपैकी एक आहे. 5. अॅडव्हॉन्स एक्सेल: डेटा, आकडेवारी, फायनान्स मॅनेज करण्यासाठी आणि उत्पादनं व सेवा बाजारात किती चांगली कामगिरी करत आहेत याचं मूल्यांकन करण्यासाठी सामान्यतः एक्सेलचा वापर केला जातो. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना, एक्सेलची परिमाणवाचक डेटा मॅनेज, कॅल्क्युलेट आणि मूल्यांकन करण्याची क्षमता उपयुक्त ठरते. कंपन्या अशा प्रोफेशनल्सच्या शोधात असतात जे त्यांची उत्पादकता वाढवू शकतात.