जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Strong Woman : सशक्त स्त्रीमध्ये असतात या 6 गोष्टी; तुम्ही स्वतःला किती नंबर द्याल

Strong Woman : सशक्त स्त्रीमध्ये असतात या 6 गोष्टी; तुम्ही स्वतःला किती नंबर द्याल

सशक्त स्त्री

सशक्त स्त्री

आपल्या देशात अनेकजण महिलांना नाजूक आणि भावनिकदृष्ट्या कमकुवत मानतात. परंतु अनेक महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवत सर्वांसमोरच एक उदाहरण ठेवलं आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 19 एप्रिल : आपल्या देशात अनेकजण महिलांना नाजूक आणि भावनिकदृष्ट्या कमकुवत मानतात. परंतु अनेक महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवत सर्वांसमोरच एक उदाहरण ठेवलं आहे. सर्व प्रकारच्या परिस्थितीला एक सशक्त महिला सक्षमपणे सामोरी जाऊ शकते, हे दाखवून दिलंय. तुम्हालाही प्रश्न पडला असेल एक सशक्त अर्थात स्ट्राँग महिला कशी ओळखावी? चला तर, आज आम्ही तुम्हाला एका स्ट्रॉंग वूमनची ओळख नेमकी काय असते, एखादी महिला एक स्ट्राँग वूमन कशी बनू शकते, याबाबतच माहिती देणार आहोत.

    News18लोकमत
    News18लोकमत

    1. तुमचा ‘आत्मविश्वास’ तुम्ही मानसिकदृष्ट्या किती खंबीर आहात, हे सांगत असतो. जेव्हा तुम्हाला स्वतःवर असतो, तेव्हा तुम्ही स्वतःची चांगली काळजी घेता, आणि स्वतःची इतरांशी कधीही तुलना करत नाही. यामुळे अशा महिला नेहमी आनंदी असतात, म्हणूनच आत्मविश्वास ही कोणत्याही सशक्त महिलेची पहिली ओळख मानली जाते. 2. सशक्त मनाची स्त्री नेहमी तिचं जीवन प्रॉडक्टिव ठेवते, व नेहमी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते. ती काळानुसार अपडेट राहते, व तिला नवीन वातावरणात जुळवून घेणं अवघड जात नाही. हेही वाचा -  पार्किंगमध्ये असलेल्या कारमधून निघाला लांबलचक किंग कोब्रा, अंगावर काटा आणणारा Video 3. मानसिकदृष्ट्या मजबूत स्त्री निराशावादी नसते. तिचा दृष्टिकोन खूप सकारात्मक असतो, आणि ती सातत्यानं तिच्या सभोवताली चांगली स्पंदन (वाइब्स) निर्माण करत राहते. अर्थात नेहमीच आशावादी आणि सकारात्मक विचार करणं शक्य होणार नाही. पण प्रत्येक वेळी ती अशी मानसिकता टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते, ज्यामुळे ती आणि तिच्या सभोवतालचे लोक नेहमीच चांगल्या मूडमध्ये असतात. 4. मानसिकदृष्ट्या मजबूत स्त्रिया स्वतःची तसेच इतरांची काळजी घेतात. त्यामुळे अशा महिलेचं तिच्या आसपास असणाऱ्या लोकांसोबत एक सकारात्मक नातं निर्माण होतं. खरंतर, जेव्हा तुम्हाला इतर लोकांच्या आनंदाची काळजी असते, तेव्हा ते तुम्हालाही आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. ही विचारसरणी सशक्त महिलांमध्येसुद्धा असते. 5 मानसिकदृष्ट्या मजबूत महिलेला इतरांकडून करण्यात येणाऱ्या टीका-टिप्पण्यांकडे दुर्लक्ष कसं करावं, हे माहीत असतं. ती तिचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीवर सहज मात करू शकते. इतकंच नाही, तर तिचा स्वतःवर विश्वास असतो. तसंच ती अशा महिलांच्या मदतीसाठी पुढे येते, ज्यांना खरोखरच मदतीची गरज आहे. 6. मानसिकदृष्ट्या मजबूत स्त्रिया भीती, समस्या आणि त्यांच्यासमोर उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यावर विश्वास ठेवतात. काहीतरी चुकीचे होईल, किंवा याचे परिणाम नकारात्मक होतील, या भीतीने त्या संकटापासून पळून जात नाहीत. उलट, जोपर्यंत भीती, संकट दूर होत नाही, तोपर्यंत त्या परिस्थितीला सामोरं जाणं पसंत करतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Viral , woman
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात