JOIN US
मराठी बातम्या / करिअर / TCS, Infosys या वर्षात 90,000 नोकऱ्या देणार; WFH सुरू राहणार; IT Jobबद्दल जाणून घ्या सर्व काही

TCS, Infosys या वर्षात 90,000 नोकऱ्या देणार; WFH सुरू राहणार; IT Jobबद्दल जाणून घ्या सर्व काही

TCS आणि Infosys द्वारे नव्याने भरती करण्याच्या बाबतीत, कंपन्यांनी FY21 मध्ये एकूण 61,000 कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले. हे FY22 मध्ये अनेक पटींनी वाढले आणि ते पुढेही तसेच राहण्याची शक्यता आहे. TCS आणि Infosys ने FY22 मध्ये अनुक्रमे 100,000 आणि 85,000 फ्रेशर्सना नोकरीची संधी दिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 एप्रिल : माहिती तंत्रज्ञान उद्योगाला सध्या चांगले दिवस आले आहेत. मात्र, अशातच कर्मचाऱ्यांचं नोकऱ्या सोडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. यावर मात करण्यासाठी कंपन्या त्यांची नवीन भरती वाढवत आहेत. भारतातील सर्वात मोठी IT सेवा कंपनी TCS 40,000 कर्मचार्‍यांची नियुक्ती करणार आहे. आणखी एक प्रमुख कंपनी Infosys चालू आर्थिक वर्षात 50,000 हून अधिक नोकरीच्या संधी देण्याचा विचार करत आहे. मार्च 2022 तिमाहीत इन्फोसिसचा अ‍ॅट्रिशन रेट (कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचं प्रमाण) 27.7 टक्क्यांवर पोहोचला. हा दर डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 25.5 टक्के होता. 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत, TCS ची कर्मचारी गळती 17.4 टक्के होती, एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत ती केवळ 7.3 टक्के होती. डिसेंबर 2021 च्या तिमाहीतही, TCS चं हे प्रमाण 15.3 टक्के होतं. टीसीएस व्यवस्थापनाने सांगितलं की, शेवटच्या-बारा-महिन्याच्या (एलटीएम) आधारावर ही संख्या जास्त आहे. इन्फोसिस व्यवस्थापनाचंही हेच म्हणणं आहे. TCS आणि Infosys द्वारे नव्याने भरती करण्याच्या बाबतीत, कंपन्यांनी FY21 मध्ये एकूण 61,000 कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले. हे FY22 मध्ये अनेक पटींनी वाढले आणि ते पुढेही तसेच राहण्याची शक्यता आहे. TCS आणि Infosys ने FY22 मध्ये अनुक्रमे 100,000 आणि 85,000 फ्रेशर्सना नोकरीची संधी दिली. हे वाचा -  Ammonia गॅस गळती; श्वास घेण्यास त्रास, डझनभर लोकं रुग्णालयात दाखल Infosys नं म्हटलं आहे की, ते FY23 मध्ये 50,000 हून अधिक फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याच्या विचारात आहेत. “गेल्या वर्षात, आम्ही संपूर्ण भारत आणि जागतिक स्तरावर 85,000 फ्रेशर्सना कामावर घेतलं आहे. आम्ही कमीत कमी 50,000 (या वर्षी) पेक्षा जास्त उमेदवारांना कामावर घेण्याची योजना आखत आहोत आणि याचा कसा परिणाम होतो, ते पाहू. तसंच हे फक्त सुरुवातीचे आकडे आहेत," असं इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय म्हणाले. त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. टीसीएसने असंही म्हटलं आहे की, पुढे जाऊन, त्याची नवीन तरुणांना नोकरीची संधी देण्याची गती मागील आर्थिक वर्षासारखीच असेल. कंपनी वर्षाची सुरुवात 40,000 भरतीचे लक्ष्य घेऊन करत आहे आणि वर्षभरात गरज पडल्यास ती वाढवेल, असे TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. जी. सुब्रमण्यम यांनी सांगितलं. हे वाचा -  PHOTOS : कशी काम करते प्रशांत किशोर यांची कंपनी I-PAC, कुठे आहे हेड क्वार्टर्स वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम (WFH) मॉडेल आयटी क्षेत्रात चांगल्या प्रकारे चाललं आहे. यानंतर आता या क्षेत्रात हायब्रीड वर्क मॉडेल लागू करण्याची योजना तयार केली जात आहे. TCS ने असंही म्हटलं आहे की, कंपनी त्यांचे भविष्यवादी आणि पाथ-ब्रेकिंग 25X25 मॉडेल स्वीकारण्यासाठी वचनबद्ध आहे. या मॉडेलचा अर्थ आहे की, कंपनीच्या 25 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना केव्हाही ऑफिसमधून काम करणं आवश्यक नाही आणि त्यांना त्यांच्या वेळेतील 25 टक्क्यांहून अधिक वेळ ऑफिसमध्ये घालवण्याची गरज नाही. हे वाचा -  VIDEO: भाषण करतानाच रतन टाटा झाले Emotional,आयुष्यातील शेवटची वर्षे… TCS ऑकेजनल ऑपरेटिंग झोन (OOZ) आणि हॉट डेस्क देखील सेट करत आहे. हे जगभरात बदलत्या कामाच्या जागा (agile work seats) सेट करत आहे, याच्यामुळे कंपनीतील लोकांना आणि सहयोगींना काम करण्यासाठी कोणत्याही TCS कार्यालयात जाण्याची परवानगी मिळेल. प्रमुख IT कंपनी Infosys ने असंही म्हटलंय की, ते “कार्यालयात टप्प्याटप्प्याने परत येण्याची” योजना आखत आहेत, याच्यामुळे त्यांच्या कर्मचार्‍यांना आठवड्यातून एक किंवा दोन दिवस वैयक्तिकरित्या कार्यालयात हजर रहावं लागेल. मात्र, कंपनी दीर्घकाळासाठी कामाचे हायब्रिड मॉडेल स्वीकारत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या