जाहिरात
मराठी बातम्या / देश / VIDEO: अन् आयुष्यातल्या शेवटच्या मिशनबद्दल बोलताना रतन टाटा Emotional

VIDEO: अन् आयुष्यातल्या शेवटच्या मिशनबद्दल बोलताना रतन टाटा Emotional

VIDEO: अन् आयुष्यातल्या शेवटच्या मिशनबद्दल बोलताना रतन टाटा Emotional

नवीन एका रुग्णालयाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान बोलताना रतन टाटा भावूक (Emotional)झालेले पाहायला मिळाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

आसाम, 29 एप्रिल: गुरुवारी आसाममध्ये (Assam) 7 कर्करोग देखरेख रुग्णालयांचं उद्घाटन आणि नवीन एका रुग्णालयाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला उद्योगपती रतन टाटा हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान बोलताना रतन टाटा भावूक (Emotional)झालेले पाहायला मिळाले. या कार्यक्रमात भावूक झालेले रतन टाटा म्हणाले की, आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्यासाठी समर्पित केली आहेत. सामाजिक कामांसाठी रतन टाटा यांचं योगदान फार मोठं आहे हे सर्वांना माहित आहे. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातल्या शेवटच्या मिशनबद्दलही भाष्य केलं. रतन टाटा यांचे भावूक दोन शब्द आसामला असं राज्य बनवा की सर्वांनी त्याचा सन्मान केला पाहिजे. आसामच्या इतिहासातील आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कॅन्सर उपचारासाठी उत्तम दर्जाची सुविधा असलेलं आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. जागतिक स्तराची कॅन्सर उपचाराची सुविधा आसाममध्ये असेल. रतन टाटा देशभरात कॅन्सर हॉस्पिटल सुरु करणार आहेत. मुंबईतल्या कॅन्सर हॉस्पिटलवरील ताण कमी व्हावा यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

जाहिरात

पुढे रतन टाटा म्हणाले की, मला हिंदीत भाषण करता येत नाही. त्यामुळे मी इंग्रजीत बोलतो. पण मेसेज एकच असेल, तो म्हणजे माझ्या आयुष्यातील शेवटची वर्षे मी आरोग्यासाठी समर्पित करत आहे. आसाम हे असं राज्य बनवा ज्याला सर्वजण ओळखतील आणि या राज्याची वेगळी ओळख निर्माण होईल. टाटा ट्रस्टचे पंतप्रधान मोदींनी मानले आभार रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाटा ट्रस्टचे आभार मानले आहेत. कॅन्सर ही एक मोठी समस्या आहे. आसामच नाही तर नॉर्थ ईस्टमध्येही ही समस्या आहे. त्यामुळे गरिबांना, मध्यमवर्गीयांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी लोकांना मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं. त्यामुले लोकांवर मोठा आर्थिक ताण सुद्धा येतो. म्हणून याचाच विचार करुन या रुग्णालयाची स्थापना केली आहे. हा सर्व विचार करुन या वर्गासाठी हे रुग्णालय एक मोठा दिलासा असणार आहे. यासाठी मी सर्बानंद सोनोवाल आणि टाटा ट्रस्टचे आभार मानतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात