2BHK फ्लॅटमध्ये सुरु केली कंपनी; आज आहे हजारो कोटींची संपत्ती
मुंबई, 19, जून: आजकालच्या काळात ऑनलाईन शॉपिंग अप्लिकेशन्सची प्रचंड गर्दी झाली आहे. मात्र आजपासून काही वर्ष आधी अशी स्थिती नव्हती. सोशल मीडिया आणि इंटरनेट इतकं स्वस्त नसतानाच्या काळात देशात अशा काही कंपन्या तयार झाल्या आहेत ज्यांच्या यशाची कल्पना ना कोणी केली असेल ना विचारही केला असेल. त्य्यापैकीच एक कंपनी म्हणजे स्वदेशी कंपनी फ्लिपकार्ट. फ्लिपकार्ट ही भारताची पहिली ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट आहे असं म्हणता येऊ शकेल. पण या फ्लिपकार्टचा प्रवास हा एका रिजेक्शनपासून झाला होता हे तुम्हाला माहिती आहे का? नक्की काय होती फ्लिपकार्टच्या यशामागची इनसाईड स्टोरी? जाणून घेऊया. फ्लिपकार्टचे फाउंडर्स सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांच्या यशोगाथेबद्दल फार लोकांना माहिती नसेलच. सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल हे दोघं फ्लिपकार्टचे संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती आता अब्जावधींच्या घरात आहे. दोघांनीही प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), दिल्ली येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलं आहे. दोघेही आयआयटी दिल्लीच्या 2005 च्या बॅचचे विद्यार्थी आहेत, फ्लिपकार्ट आज इथपर्यंत आहे यात फाउंडर्स म्हणून दोघांचाही संपूर्ण हात आहे. JOB ALERT: राज्यातील ‘या’ कृषी विद्यापीठात ग्रॅज्युएट्ससाठी पदभरतीची घोषणा; किती असेल पगार? बघा डिटेल्स अशी सुचली कल्पना जेव्हा सचिन आणि बिन्नी बन्सल आयआयटी दिल्लीतून उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांनी ऑनलाइन स्टोअर सुरू करण्याचा विचार केला. त्यांचे लक्ष्य तेव्हा 50 दशलक्ष इंटरनेट युजर्सचं लक्ष्य होतं. अनेकांना सचिन आणि बिन्नी भाऊ वाटतात पण तसं नाही. अर्थात त्यांचं आडनाव एकच आहे मात्र ते दोघं मित्र आहेत. गुगलनं सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांना दोनदा रिजेक्ट केल्यानंतर फ्लिपकार्टची सुरुवात झाली. फ्लिपकार्टची सुरुवात ऑनलाइन बुकस्टोअर म्हणून झाली. बिन्नी आणि सचिन यांनी एकूण 2,71,000 रुपये जमा करून निधी तयार केला. अशा प्रकारे फ्लिपकार्टची स्थापना झाली. गंमत म्हणजे अॅमेझॉनचीही अशीच सुरुवात झाली आणि नंतर सर्व काही विकायला सुरुवात झाली. फ्लिपकार्टने ऑनलाइन बुकस्टोअर म्हणूनही सुरुवात केली आणि भारतातील अॅमेझॉनची स्पर्धक बनली. Success Story: कधीकाळी MBA करण्यासाठीही नव्हते पैसे; आज ‘हे’ आहेत 95,000 कोटींच्या कंपनीचे मालक 2BHK फ्लॅटमध्ये सुरू झालं ऑफिस फ्लिपकार्ट पहिल्यांदा 2007 मध्ये बंगळुरूमध्ये एका छोट्या 2BHK फ्लॅटमध्ये सुरू करण्यात आली होती. सचिनने फ्लिपकार्टचे सीईओ म्हणून काम सुरू केलं. तर बिन्नीने वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाइटचं सीओओ पद स्वीकारलं. 2012 मध्ये $150 दशलक्ष उभारल्यानंतर, फ्लिपकार्ट लवकरच भारतातील दुसरी युनिकॉर्न कंपनी बनली. मात्र वॉलमार्टने कंपनीचे ७७ टक्क्यांहून अधिक शेअर्स ताब्यात घेतल्यानंतर बिन्नी आणि सचिन या दोघांनीही कंपनी सोडली.
केला सर्वात मोठा करार वॉलमार्टने 16 अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक करारात फ्लिपकार्टचे 77 टक्के शेअर्स खरेदी केले. इंटरनेट फर्मशी संबंधित हा सर्वात मोठा सौदा ठरला. कॅश आऊट करून कंपनी सोडली तरीही सचिन आणि बिन्नी बन्सल अजूनही अब्जाधीश आहेत. सचिन बन्सल यांची एकूण मालमत्ता $1.3 अब्ज आहे, जी भारतीय चलनात 10,648 कोटी रुपये आहे. बिन्नी बन्सल यांची एकूण संपत्ती 11,467 कोटी रुपये आहे.