JOIN US
मराठी बातम्या / करिअर / एकेकाळी Degree घेण्यासाठीही नव्हते पैसे; जिद्दीने गरीब शेतकऱ्याच्या मुलीने मिळवली TVS कंपनीत नोकरी

एकेकाळी Degree घेण्यासाठीही नव्हते पैसे; जिद्दीने गरीब शेतकऱ्याच्या मुलीने मिळवली TVS कंपनीत नोकरी

राजसुंदरीने सरकारी शाळेतून दहावी उत्तीर्ण केल्यानंतर तिचे वडील तिला उच्च शिक्षण घेऊ देण्यासाठी तयार नव्हते.

जाहिरात

राजसुंदरी थिरुमुगम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 मे:  घरची परिस्थिती बेताची, त्यात पाच बहिणी, वडील मजुरी करतात. अशा परिस्थितीत शिक्षण कसं घ्यावं?, हा राजसुंदरीसमोरचा सर्वांत मोठा प्रश्न होता. तमिळनाडूतील (Tamil Nadu) तिरुवन्नमलाई येथील कमलंदापुरम गावात ती राहते. राजसुंदरी थिरुमुगम (Success story of Rajasundari Thirumugam) ही पाच बहिणींमध्ये सर्वांत मोठी आहे. घरातल्या सर्वांना दोन वेळचं अन्न मिळेल, इतकं कमावणं हेही तिच्या वडिलांसमोरचं मोठं आव्हान होतं. त्यामुळे राजसुंदरीने सरकारी शाळेतून दहावी उत्तीर्ण केल्यानंतर तिचे वडील तिला उच्च शिक्षण घेऊ देण्यासाठी तयार नव्हते.

अशातच राजसुंदरीच्या आई थिलाका यांना त्यांच्या गावातील एका बचत गटाद्वारे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यास मोफत कोचिंग दिलं जात असल्याची माहिती मिळाली. तिच्या कुटुंबाने मोफत प्रशिक्षणाची ही संधी साधली आणि राजसुंदरीला पाठवायचं ठरवलं. या प्रशिक्षणानंतर राजसुंदरीने प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिला एका चांगल्या व्यावसायिक संस्थेत शिक्षण घेता आलं. तिने तिथे चांगला अभ्यास करून उत्तम गुण मिळवले. त्या आधारे तिला पोल्लाचीच्या नचिमुथु व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेत (Pollachi’s Nachimuthu Vocational Training Institute) म्हणजे आयटीआयमध्ये मॅकेनिकल इंजिनीअरिंग ट्रेडला प्रवेश मिळाला.

वय 55 वर्ष, 25 वेळा नापास; आवडत्या विद्यापीठासाठी 26व्या वेळी देणार परीक्षा

आता प्रवेश तर मिळाला; पण राजसुंदरीचं शिक्षण तमीळमध्ये झालेलं, त्यामुळे तिला इंग्रजीतून शिक्षण घेण्यात अडचणी येऊ लागल्या. ती आणि तिच्यासारख्या इतर बिगर-इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून शिकून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेने स्पोकन इंग्लिश (Spoken English) आणि कम्युनिकेशन स्किलचे (Communication Skills) एक्स्ट्रा क्लास सुरू केले. या क्लासेसची तिच्यासह इतर विद्यार्थ्यांना खूप मदत झाली. त्यामुळे यांना चांगला अभ्यास करता आला आणि परिक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत झाली. तिच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात, तिने पहिल्या वर्षी 69 टक्के गुण मिळवले होते, परंतु आत्मविश्वास वाढल्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी तिने अनुक्रमे 79 टक्के आणि 84 टक्के गुण मिळवले.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी (Job) मिळवणं हा राजसुंदरीचा उद्देश होता. चांगली नोकरी मिळाल्यास तिच्या पगाराची घरी मदत होईल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल, असं तिला वाटत होतं. दरम्यान, परीक्षा आणि मुलाखतीच्या अनेक फेऱ्यांनंतर राजसुंदरीला टीव्हीएस या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये (TVS) नोकरी मिळाली. योगायोगाने, तिला सुरुवातीला ज्या बचत गटाची मदत झाली होती तो गट श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टशी (Srinivasan Services Trust) संबंधित होता. हा ट्रस्ट TVS मोटर्स कंपनीच्या सीएसआर विभागाअतंर्गत काम करतो. त्यामुळे तिला टीव्हीएसमध्ये नोकरी मिळाल्याने ती खूप खूश झाली.

“अनेक स्तरीय परीक्षा आणि मुलाखतीद्वारे मी नोकरी मिळवली. संस्थेत तीन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर गेल्या साडेचार वर्षांपासून मी काम करत आहे,” असं राजसुंदरीने News18.com ला सांगितलं. नोकरी मिळवण्यासाठी इंग्रजी येणं गरजेचं नाही. इंग्रजीमुळे गोष्टी सोप्या होतात, हे खरंय परंतु नोकरी मिळवण्यासाठी किंवा करण्यासाठी ही भाषा अनिवार्य नाही, असं 23 वर्षीय राजसुंदरी म्हणते.

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याने राजसुंदरीच्या घरच्यांनाही मदत होत आहे. तिची दुसरी बहीण बायोकेमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन करत आहे, तर तिसर्‍या बहिणीने राजसुंदरी सारखाच कोर्स केला आहे. त्या दोघी आता सोबत काम करतात. तर, तिची चौथी बहीण 12 वीत आहे आणि सर्वांत धाकटी बहीण सातवीत शिकत आहे.

Engineer उमेदवारांनो, इथे मिळेल नोकरी; BEL मध्ये ‘या’ पदांसाठी Vacancy; करा अर्ज

राजसुंदरीला आता उच्च शिक्षण घ्यायचंय. तिच्या कंपनीकडून उच्च शिक्षणासाठी (higher Education) मदत केली जात आहे. तिने यासाठी अर्जही केला आहे आणि ती अर्जावर उत्तराची वाट बघते आहे. राजासुंदरी सध्या TVS च्या Quality Engineering Department मध्ये काम करते आणि भविष्यात त्या विभागाची प्रमुख होण्याचं तिचं ध्येय आहे. राजसुंदरीची ही कहाणी आजच्या तरुणपिढीला प्रेरणा देणारी आहे. घरची परिस्थिती बेताची असूनही राजासुंदरीने मिळवलेलं यश कौतुकास्पद आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या