चीन, 20 मे: स्वप्न
(Dream) तीच असतात जी कधीही व्यक्तिला स्वस्थ बसू नाही देत. चीनमध्ये अशाच एका स्वप्नवेड्या माणसाची कहाणी समोर आली आहे. लियांग शी
(Liang Shi) असे या व्यक्तीचे नाव आहे. ते 55 वर्षांचे आहेत. बालपणीच त्यांनी एक स्वप्न पाहिले होते आणि या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ते आजही प्रयत्न करत आहेत.
काय स्वप्न पाहिलं
चीनमधील 55 वर्षीय व्यक्तीने एक स्वप्न पाहिलं होतं की ते एक सिचुआन विद्यापीठातून
(Sichuan University) शिक्षण घेतील. मात्र, त्यांचं हे स्वप्न पूर्ण आजही पूर्ण झालेलं नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य होईल की, या प्रसिद्ध विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी त्यांनी एक-दोनदा नव्हे तर तब्बल 25 वेळा प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नांमध्ये ते यशस्वी होई शकले नाही. अनेकजण 8-10 वेळा परीक्षा दिल्यावर हार मानून घेतात. मात्र, 25 वेळा अपयश आल्यावर लियांश शी यांना आजही विश्वास आहे की एक दिवस ते ही परीक्षा पास करुन घेतील. लवकरच ते आता 26 व्या वेळी प्रवेश परीक्षा देणार आहेत.
जगातील सर्वात कठीण परिक्षांपैकी एक
चीनमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी एक सामायिक परीक्षा होते. या परिक्षेला
gaokao exam असे म्हटले जाते. याच माध्यमातून महाविद्यालयात प्रवेश मिळतो.
gaokao ही प्रवेश परीक्षा ही जगातील सर्वात कठीण विद्यापीठ प्रवेश परीक्षांपैकी एक आहे, असे मानले जाते. या परिक्षेसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. मात्र, चीनमधील टॉप विद्यापीठांमध्ये जागा फार कमी असतात. चीनमध्ये तर असे म्हटले जाते की, ही एक परीक्षा त्यांचं भविष्य ठरवते.
लियांश शी ही परीक्षा 1983 पासून देत आहेत. त्यांनी ही परीक्षा पासही केली. मात्र, त्यांचा स्कोर हा दुसऱ्या विद्यापीठात प्रवेश मिळवण्याइतका होता. म्हणून त्यांनी त्या विद्यापीठात प्रवेश घेतलाच नाही. ते सतत 25 वर्षांपासून सिचुआन विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी परीक्षा देत आहेत. हा प्रवास तेव्हाच संपेल, जेव्हा त्यांना आपल्या आवडत्या विद्यापीठात प्रवेश मिळेल, असे ते स्पष्ट करतात.
हेही वाचा - 'हव्या तेवढ्या पगारी रजा घ्या;' वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी 'या' मोठ्या कंपनीच्या स्पेशल ऑफर्स; वाचून वाटेल हेवा
लियांग शी यांना प्रवेश परीक्षेत सर्वात जास्त समस्या ही विज्ञानात येते. यावेळी ते आर्ट्स स्ट्रीमसाठी परीक्षा देतील. लोक त्यांना म्हणतात की, त्यांची स्मरणशक्ती कमी होत आहे आणि केलेला अभ्यास ते विसरुन जातील. मात्र, लोक जे म्हणत आहेत ते चुकीचं आहे, असे लियांग शी यांना दाखवून द्यायचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.