JOIN US
मराठी बातम्या / करिअर / ज्यांच्या फक्त नावानं नक्षलवाद्यांनाही फुटतो घाम; छत्तीसगडमध्ये नक्षल्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या महिला IPS

ज्यांच्या फक्त नावानं नक्षलवाद्यांनाही फुटतो घाम; छत्तीसगडमध्ये नक्षल्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या महिला IPS

त्यांच्या नावानं नक्षलवादीही थरथर कापतात. जाणून घेउया आयपीएस अंकिता शर्मा यांच्याबद्दल.

जाहिरात

IPS अंकिता शर्मा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 एप्रिल: देशात अनेक दबंग महिला IPS ऑफिसर्स आहेत. पण आज आम्ही तुम्हाला ज्या महिला ऑफिसरबद्दल सांगणार आहोत त्या खास आहेत. ज्या नक्षलवाद्यांशी सामना करण्यासाठी भलेभले मागे हटतात त्यांच्याशी थेट दोन हात करणाऱ्या या महिला IPS ऑफिसर आहेत. त्यांच्या नावानं नक्षलवादीही थरथर कापतात. जाणून घेउया आयपीएस अंकिता शर्मा यांच्याबद्दल. आयपीएस अंकिता शर्मा छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तरमध्ये सहाय्यक अधीक्षक पदावर असून नक्षल ऑपरेशनचे नेतृत्व करत आहेत. बस्तरमध्ये नक्षल ऑपरेशनचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. त्याचे वडील राकेश शर्मा हे व्यापारी आहेत आणि आई सविता शर्मा गृहिणी आहेत. अंकिता तीन बहिणींमध्ये मोठी आहे. ज्यांचं फक्त नाव घेतलं तरी गुन्हेगारांच्या अंगाचा उडतो थरकाप; कोण आहेत या ‘मर्दानी लेडी सुपरकॉप’? छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातल्या अंकिताने तिचे सुरुवातीचे शिक्षण सरकारी शाळेतून केले. पदवीनंतर अंकिताने एमबीए केले आणि यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला गेल्या. त्या फक्त सहा महिने दिल्लीत राहिल्या आणि स्वयंअध्ययन करून आयपीएस अधिकारी होण्यात यशस्वी झाल्या. अंकिताला पहिल्या दोन प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळाले नाही, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी ती कोणतीही कसर सोडत नाही. 2018 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले आणि 203 वा क्रमांक मिळाला. छत्तीसगडच्या त्या पहिल्या महिला आयपीएस आहेत ज्यांना होम कॅडर मिळाले आहे IPS अधिकारी होण्यापूर्वीच अंकिता शर्माचे लग्न झाले होते. तो भारतीय लष्करात मेजर असून सध्या मुंबईत तैनात आहे. अंकिताला घोडेस्वारी आणि बॅडमिंटन खेळण्याची आवड आहे. इन्स्टाग्रामवर ती अनेकदा घोडेस्वारीचे फोटो शेअर करत असते. 7 सशस्त्र गुंडांशी तब्बल 4 तास एन्काउंटर; लोखंडवालातील ‘त्या’ शूटआऊटचे खरे हिरो; कोण होते IPS आफताब अहमद खान 2020 मध्ये, प्रजासत्ताक दिनी, अंकिता शर्माने छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील पोलीस परेड ग्राउंडवर परेडचे नेतृत्व केले. प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व करणाऱ्या त्या छत्तीसगडच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत. स्वतःच्या त्रासातून शिकून अंकिता अशा तरुणांना मदत करते ज्यांना आयुष्यात काहीतरी मिळवायचे आहे. आठवडाभर पोलीस ड्युटी केल्यानंतर ती रविवारी शिक्षिका बनते. ती तिच्या ऑफिसमध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या 20-25 तरुणांना शिकवते.

काही दिवसांपूर्वी एका सोशल मीडिया यूजरने अंकिता शर्माचे फोटो शेअर करत ट्विट केले होते की, ‘बस्तरमध्ये पहिल्यांदाच नक्षल ऑपरेशनची कमान एका महिला आयपीएसच्या हाती आहे.’ रवीना टंडनने हे ट्विट रिट्विट करून त्याचे कौतुक केले. त्याबद्दल अंकिता शर्मा यांनी आभार मानले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या