JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Success Story: पुण्यात जन्म, IIM मधून शिक्षण आता थेट वर्ल्ड बँकेचे चीफ; नक्की कोण आहेत अजय बंगा?

Success Story: पुण्यात जन्म, IIM मधून शिक्षण आता थेट वर्ल्ड बँकेचे चीफ; नक्की कोण आहेत अजय बंगा?

जागतिक बँकेच्या प्रमुखपदी निवड झालेले अजय बंगा हे पहिले भारतीय आहेत.

जाहिरात

नक्की कोण आहेत अजय बंगा?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 फेब्रुवारी: मास्टरकार्डचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बंगा हे जागतिक बँकेचे पुढील प्रमुख असतील. भारतवंशी अजय बंगा यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी या पदासाठी नामांकन दिले आहे. अजय बंगा हे जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांची जागा घेतील. जागतिक बँकेच्या प्रमुखपदी निवड झालेले अजय बंगा हे पहिले भारतीय आहेत. बंगा सध्या इक्विटी फर्म जनरल अटलांटिकचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याआधी ते मास्टरकार्डचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संचालक मंडळाचे सदस्य होते. ते गेल्या वर्षीच मास्टरकार्डच्या सीईओ पदावरून निवृत्त झाले. त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त व्यवसायाचा अनुभव आहे. अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे भारतातील त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. अजय बंगा यांनी कोठून शिक्षण घेतले आहे आणि त्यांच्याकडे कोणत्या पदवी आहेत ते जाणून घेऊया. परदेशातून आली पुण्यात अन् थेट टेक ओव्हर केला बिझनेस; आज तब्बल 6000 कोटींची करते उलाढाल दिल्ली आणि आयआयएममधून शिक्षण 63 वर्षीय अजय बंगा यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1959 रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला. ते मूळचे पंजाबमधील जालंधरचा असले तरी शिमला येथील सेंट एडवर्ड स्कूल आणि हैदराबादच्या हैदराबाद पब्लिक स्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांचे वडील हरभजन सिंग हे भारतीय लष्करात अधिकारी होते. 1970 मध्ये त्यांची हैद्राबाद येथे नियुक्ती झाली. शालेय शिक्षणानंतर, बंगा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए (ऑनर्स) पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून व्यवस्थापन विषयात पीजीपी (एमबीए समतुल्य) केले. बंगा 2007 मध्ये अमेरिकन नागरिक झाले. “रूम भाड्याने देऊन असे किती पैसे कमावणार?” लोकांनी डिवचलं अन् पठ्ठयानं उभी केली 8000 कोटींची कंपनी अजय बंगा जेव्हा मास्टरकार्डचे सीईओ होते, तेव्हा त्यांची रोजची कमाई 52,60,000 रुपये होती. मास्टरकार्डच्या आधी ते भारतातील सिटीग्रुप आणि नेस्लेमध्ये होते. ते डच इन्व्हेस्टमेंट फर्म एक्सॉरचे अध्यक्षही आहेत. CNBC नुसार, 2021 मध्ये अजय बंगा यांची एकूण संपत्ती US$ 206 दशलक्ष होती. जी भारतीय चलनात 1700 कोटींहून अधिक असेल.

नेस्लेसोबत करिअरला सुरुवात अजय बंगा यांनी 1981 मध्‍ये नेस्लेसोबत आपल्‍या व्‍यवसाय करिअरची सुरूवात केली. याशिवाय त्यांनी दोन वर्षे पेप्सिकोमध्येही काम केले. त्यांनी अमेरिकन रेड क्रॉस, क्राफ्ट फूड्स आणि डाऊ इंक मध्ये देखील काम केले आहे. बंग यांना सामाजिक प्रश्नांमध्ये खूप रस आहे. ते आर्थिक शिक्षण परिषदेचे संचालकही राहिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या