JOIN US
मराठी बातम्या / करिअर / CBSE Exam Tips: विद्यार्थ्यांनो, अभ्यासासाठी कोणावर अवलंबून राहू नका; असा स्वतःहून करा अभ्यास

CBSE Exam Tips: विद्यार्थ्यांनो, अभ्यासासाठी कोणावर अवलंबून राहू नका; असा स्वतःहून करा अभ्यास

आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वतःहून अभ्यास करण्याच्या टिप्स देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

जाहिरात

पहाटे अभ्यास करण्यासाठी नक्की जाग येईल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 एप्रिल: परीक्षा म्हंटलं की विद्यार्थ्यांच्या मनात सतत अभ्यास अभ्यास (Study during exams) असतो. यामुळे विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा मानसिक ताण (tension during exam) निर्माण होऊ शकतो. मग परीक्षा जसजशी जवळ येऊ लागते तसतसे अभ्यासाचे तास वाढू लागतात. मात्र याच काळात अनेक सणही असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास नीट होऊ शकत नाही. पण आता चिंता नको. जर तुमच्याकडे काही स्वतःवर आत्मविश्वास आणि स्वतःहून अभ्यास (how to do self study) करण्याची इच्छा असेल तर तुम्हीही परीक्षेतचांगले मार्क्स मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वतःहून अभ्यास करण्याच्या टिप्स देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. अभ्यासाचं साहित्य असणं आवश्यक जोपर्यंत तुमच्याकडे अभ्यासाचं साहित्य असणार नाही तुमचा अभ्यास चांगला होणार नाही. म्हणूनच स्वत:च्या अभ्यासादरम्यान, तुमच्यासाठी योग्य अभ्यास साहित्य असणे महत्त्वाचे आहे. यासाठी वरिष्ठांशी बोलून त्यांचे मत जाणून घेऊ शकता. बुक स्टोअर्स, एनसीईआरटी, लायब्ररी, ई-कॉमर्स साइट्स किंवा किंवा जुन्या पुस्तकांच्या मदतीनं अभ्यास करा. CBSE Term II Exam: विद्यार्थ्यांनो, बोर्डानं परीक्षेसाठी नियमावली केली जारी; पेपरला जाण्याआधी हे वाचा टाइम टेबलनुसार अभ्यास करा परीक्षेची तयारी करण्यासाठी निश्चित वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार अभ्यास करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःसाठी लहान ध्येये ठेवा. मॉक टेस्ट द्या, नोट्स बनवा आणि चालू घडामोडी वाचा. अभ्यासादरम्यान विश्रांती घ्या आणि व्यायाम करा. सेल्फ स्टडी करा कोणत्याही परीक्षेची तयारी करताना स्वत:च्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोरोनाच्या काळात प्रत्येकाला घरात राहून स्वत:ची तयारी करायला शिकवली आहे. जर तुम्ही कोचिंगची भरमसाठ फी भरू शकत नसाल तर स्वअभ्यासातून तुमची तयारी सुधारा. यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतील आणि तुमची प्रगती होईल. विद्यार्थ्यांनो, अभ्यासावर फोकस होत नाहीये? मग ‘या’ Tips नक्की येतील कामी अभ्यास करताना आत्मविश्वास ठेवा अनेकदा तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकाल की नाही हे तुमच्यातील आत्मविश्वासावर अवलंबून असते. त्यामुळे अभ्यास करताना किंवा परीक्षेची तयारी करताना आत्मविश्वास ढासळू देऊ नका. तुम्ही केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि परीक्षेला सामोरे जा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या