मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CBSE Term II Exam: विद्यार्थ्यांनो, बोर्डानं परीक्षेसाठी नियमावली केली जारी; पेपरला जाण्याआधी हे वाचा

CBSE Term II Exam: विद्यार्थ्यांनो, बोर्डानं परीक्षेसाठी नियमावली केली जारी; पेपरला जाण्याआधी हे वाचा

CBSE परीक्षेसाठी नियमावली जारी

CBSE परीक्षेसाठी नियमावली जारी

परीक्षा सुरु होण्याआधी विद्यार्थ्यांसाठी CBSE बोर्डाकडून नियमावली (Important Guidelines for CBSE Term II Exam 2022) जारी करण्यात आली आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 12 एप्रिल: कोरोनामुळे मागील वर्षी CBSE बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board Exams) रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच या शैक्षणिक वर्षात CBSE ना बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा (CBSE 10th 12th Exams 2022) दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी टर्म 1 (CBSE Term 1 Exam) ची परीक्षा घेण्यात अली होती. तर आता CBSE टर्म 2 ची परीक्षा (CBSE Term II Exam 2022) येत्या 26 एप्रिल 2022 पासून सुरु होणार आहे. मात्र ही परीक्षा सुरु होण्याआधी विद्यार्थ्यांसाठी CBSE बोर्डाकडून नियमावली (Important Guidelines for CBSE Term II Exam 2022) जारी करण्यात आली आहे. लवकरच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट आणि रोल नंबर (Hall Ticket and Roll Number for CBSE Term II Exam 2022) जारी केला जाईल. या आठवड्यात दहावी आणि बारावी परीक्षांचे रोल नंबर आणि हॉल तिकीट (CBSE exam Admit Card) CBSE संलग्न शाळांना पाठवली जातील अशी अपेक्षा आहे. जेणेकरून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांमध्ये त्याचे वाटप केले जाईल. तर खाजगी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जारी केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनो, अभ्यासावर फोकस होत नाहीये? मग 'या' Tips नक्की येतील कामी परीक्षेसाठीची नियमावली परीक्षा हॉलमध्ये 12 ऐवजी 18 विद्यार्थ्यांना एका वर्गात बसण्याची परवानगी असेल. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क आणि तापमान मोजण्यासारख्या सूचना पूर्वीप्रमाणेच याही परीक्षेत असणारा आहेत. टर्म 2 प्रश्नपत्रिका कस्टोडियन्सना पाठवल्या जातील तसंच जिओ टॅगिंग आवश्यक असेल. दहावी आणि बारावीची CBSE टर्म 2 परीक्षा दोन तासांची असेल. सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सकाळी 9.30 पर्यंत परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागेल. तसेच विद्यार्थ्यांना 10.00 नंतर प्रवेश दिला जाणार नाही. सकाळी 10:00 वाजता प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वितरित केल्या जातील. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 20 मिनिटे मिळणार आहेत. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र दाखवावे लागेल. त्यावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. शाळेत मुलींपेक्षा मुलांशी शारीरिक छळ होण्याचा धोका अधिक : UNESCO रिपोर्ट बोर्डाने सर्व सीबीएसई संलग्न शाळांना नवीन सूचना पाठवल्या आहेत. मार्गदर्शक तत्त्वे मुळात कोविड-19 बद्दल आहेत. बोर्डाने कोविड-19 बाबत घेतलेली कठोरताही कमी केली आहे. तसंच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सल्ला बोर्डाकडून देण्यात आला आहे.
First published:

Tags: Board Exam, Career, CBSE 10th, CBSE 12th, Education, Exam Fever 2022

पुढील बातम्या