कॅनडा ही अनेकांची पहिली पसंती
मुंबई, 23 मार्च: परदेशात शिक्षणासाठी जाण्याचं (Education in Abroad) अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. त्यासाठी प्रचंड मेहनत करून आणि चांगले गुण मिळवून विध्यर्थ स्वतःला तयारही करतात. पण परदेशात शिक्षण (Study in Abroad) म्हंटलं की मोठ्या प्रमाणावर पैशांची उभारणी करावी लागते. जाण्यापासून राहण्यापर्यंतचा खर्च लाखो रुपये (Money for going abroad) असतो. त्यात काही देश हे विद्यार्थ्यांचे लाडके आहेत. कॅनडा, आयर्लंड, अमेरिका, जर्मनी या देशांमध्ये उच्च शिक्षण (Best country for higher education) घेण्यासाठी विद्यार्थी जातात. त्यात कॅनडा ही अनेकांची पहिली पसंती (Why Canada is best for higher Education) असते. पण असं नक्की का? कॅनडामध्ये अशा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळे विद्यार्थी तिथे उच्च शिक्षणासाठी जातात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेउया. शिक्षणासाठी कमी खर्च परदेशातील इतर देशांच्या तुलनेत परदेशी विद्यार्थ्यांसाठी कॅनडामध्ये अभ्यास आणि राहण्याचा खर्च खूपच कमी आहे. येथे कमी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळते. कॅनडामधील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठीची फी अमेरिका आणि इंग्लंडसारख्या देशांतील प्रसिद्ध खाजगी विद्यापीठात शिकण्याच्या शुल्काच्या तुलनेत जवळपास निम्मी आहे. स्कॉलरशिप्स कॅनडामध्ये अभ्यास करण्यासाठी अनेक प्रसिद्ध विद्यापीठे आणि अभ्यासक्रम आहेत, तसेच पात्र विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देखील उपलब्ध आहे. चांगल्या विद्यार्थ्यांसाठी, कॅनडातील सरकारी महाविद्यालयात शिक्षण घेणे भारतातील अनेक प्रसिद्ध महाविद्यालयांपेक्षा स्वस्त आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार मोठं गिफ्ट अभ्यासादरम्यान होणारा खर्च उचलण्यासाठी विद्यार्थी येथे अर्धवेळ नोकरी देखील करू शकतात. जर विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात चांगले गुण मिळाले तर त्यांना वर्क परमिट देखील मिळू शकते, ज्यामुळे ते त्यांचा राहण्याचा खर्च सहज काढू शकतात. सुंदर वातावरण कॅनडाची गणना जगातील स्वच्छ देशांमध्ये केली जाते. इथे धूळ आणि माती दिसत नाही. तसेच भारतासारखी उष्णता तिथे नाही. कॅनडा हिरवाईने भरलेला आहे, येथील लोकसंख्या खूपच कमी आहे आणि वातावरण अतिशय स्वच्छ आणि शांत आहे. बहुसांस्कृतिक समिती कॅनडामध्ये 150 हून अधिक देशांचे नागरिक राहतात. त्यांच्यासोबत राहून अनेक भाषा, संस्कृती शिकता येतात. भारतातील लोकांचा तेथे विशेष आदर आहे. पंजाबी ही तिथली अधिकृत भाषाही आहे. इथं सुखवस्तू जीवन जगणं आणि डॉलर्सची कमाई हे आजचं वास्तव आहे क्या बात है! परीक्षा न देताही मिळेल सरकारी नोकरी; फक्त ‘ही’ भाषा येणं आवश्यक मानवी हक्क कॅनडा असा देश आहे जिथे वर्णद्वेषी हल्ले नगण्य आहेत. कॅनडा हा धर्मनिरपेक्ष देश आहे, जो आपल्या सर्व नागरिकांच्या जीवनाला महत्त्व देतो. सर्व नागरिक समान आहेत, प्रत्येकाला चांगले जीवन जगण्याचा समान अधिकार आहे, असे येथील सरकारचे मत आहे. तिथे जर श्रीमंत व्यक्तीने गरीब व्यक्तीशी भेदभाव केला तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई होऊ शकते.