Home /News /career /

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून युक्रेनमधून परतलेल्या मेडिकल स्टुडंट्सना मोठं गिफ्ट; देणार ऑनलाइन क्लासेस

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून युक्रेनमधून परतलेल्या मेडिकल स्टुडंट्सना मोठं गिफ्ट; देणार ऑनलाइन क्लासेस

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून ऑनलाइन कोर्सेस

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून ऑनलाइन कोर्सेस

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) युक्रेनमधून परतलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या एक एप्रिलपासून ऑनलाइन कोर्सेस सुरू करण्याचं नियोजन सुरू केलं आहे

    नाशिक23 मार्च: : कमी खर्चात वैद्यकीय शिक्षण (Medical Education) मिळतं म्हणून युक्रेनला (War Tord Ukraine) जाणाऱ्या भारतीय आणि त्यातही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यामुळे या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आलं आहे. युद्धस्थिती अनुभवल्यामुळे ते विचित्र मनःस्थितीत आहेतच. शिवाय आपलं शिक्षण अर्धवट राहण्याची भीतीही त्यांना आहे. या पार्श्वभूमीवर, नाशिकच्या (Nashik) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) युक्रेनमधून परतलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या एक एप्रिलपासून ऑनलाइन कोर्सेस (Online Courses for Medical Students) सुरू करण्याचं नियोजन सुरू केलं आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू ले. जन (निवृत्त) माधुरी कानिटकर (Madhuri Kanitkar) यांनी त्याबद्दल माहिती दिली. दी इंडियन एक्स्प्रेसने आयोजित केलेल्या आयडिया एक्स्चेंज इंटरॅक्शनमध्ये त्या बोलत होत्या. 'इंडियन एक्स्प्रेस'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे. युक्रेनमधल्या काही विद्यापीठांनी ऑनलाइन क्लासेस सुरू केले आहेत; मात्र काही राज्यांतल्या विद्यापीठांना ते शक्य झालेलं नाही. कारण त्या विद्यापीठांच्या इमारती युद्धात उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे भारतात परत आलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न उभे राहिले आहेत. JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रात जॉबची संधी; पत्त्यावर करा अर्ज कुलगुरू ले. जन. (निवृत्त) माधुरी कानिटकर यांनी सांगितलं, 'विद्यार्थी परतायला लागले, तेव्हा त्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी काय करता येईल, याबद्दल विचार करण्याची सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी आम्हाला केली. त्यानंतर आम्ही त्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातले सुमारे 3000 विद्यार्थी त्यात असावेत, असा अंदाज आहे.' 'आम्ही युक्रेनमधल्या वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास केला. तिथली शिकवण्याची पद्धत आणि अभ्यासक्रम या आपल्या तुलनेत थोडा फरक आहे. युक्रेनमध्ये सिम्युलेशनच्या (Simulation) आधारे शिकवलं जातं. पेशंटशी प्रत्यक्ष संवाद फारसा नसतो. आम्ही ऑनलाइन क्लासेसमध्ये शिकवण्याबरोबरच बेडसाइड टीचिंग (Bedside Teaching) अर्थात पेशंटला प्रत्यक्ष तपासण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना दिला, तर ते मूल्यवर्धन (Value Addition) ठरेल. त्यामुळे हे विद्यार्थी जेव्हा कोर्स पूर्ण करतील, तेव्हा त्यांना परदेशातली त्यांची वैद्यकीय परीक्षा देणं सोपं जाऊ शकेल,' असं ले. जन. (निवृत्त) कानिटकर म्हणाल्या. 'सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही एक एप्रिलपासून या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस सुरू करण्याचा विचार करत आहोत. त्यात टीचिंग मटेरियल क्युरेटेड असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार आणि सोयीनुसार अभ्यास करता येईल. त्यात बिल्ट इन असेसमेंट्सचाही (Built In Assessments) समावेश असेल. वीकेंड्सला किंवा संध्याकाळच्या वेळेत काही छोटी वर्कशॉप्स घेता येतील का, याबद्दल चाचपणी करण्याच्या सूचनाही मी डीन्सना केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना क्लिनिकल एक्स्पोजरसाठी मदत होईल,' असं कुलगुरूंनी सांगितलं. 'त्या विद्यार्थ्यांनी अगदी पुढ्यात बॉम्ब पडताना पाहिले आहेत, त्यांना किती तरी अंतर तंगडतोड करावी लागली आहे. या सगळ्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही. अशा परिस्थितीत त्यांना या कोर्सेसमुळे थोडा दिलासा मिळू शकेल. कोणी तरी आपली काळजी घेत आहे, याचा विश्वास त्यांना मिळेल,' असंही त्यांनी सांगितलं. JOB ALERT: ठाणे महानगपालिकेत 70,000 रुपये पगाराची नोकरी; इथे करा अर्ज 'आतापर्यंत सुमारे 900 विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे नोंदणी केली आहे. ते इथेच कायम राहणार आहेत का, याबद्दल आम्ही विचारणा केलेली नाही. कारण सध्या तरी तसा पर्याय उपलब्ध नाही,' असंही कुलगुरूंनी स्पष्ट केलं.
    First published:

    Tags: Job, Medical exams, Nashik, Russia Ukraine

    पुढील बातम्या