बोर्डानं या नियमात केला बदल
मुंबई, 05 मे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन सत्रापासून बोर्डाच्या परीक्षांबाबत अनेक बदल केले आहेत. CBSE नं नुकतीच यासंबंधीची घोषणा केली आहे. जे विद्यार्थी CBSE बोर्डाच्या परीक्षेत नापास होतील अशा विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. नक्की काय आहेत हे बदल जाणून घेऊया. फक्त प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागेल. आधी प्रॅक्टिकलमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि थिअरी अशा दोन्ही परीक्षा द्याव्या लागत होत्या. मात्र आता हा निर्णय बदलण्यात आला आहे. प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना थिअरी परीक्षा द्यावी लागणार नाही. प्रात्यक्षिक परीक्षा शालेय स्तरावरच घेतल्या जातील.
2023-2024 या शैक्षणिक वर्षापासून, CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कंपार्टमेंट परीक्षा यापुढे घेतल्या जाणार नाहीत. त्याऐवजी, बोर्ड पुरवणी परीक्षा घेईल. CBSE अधिसूचनेनुसार कंपार्टमेंट आणि सुधार परीक्षेचे नाव बदलून पुरवणी परीक्षा करण्यात आले आहे. आधी कर्मचाऱ्यांना दिली शानदार पार्टी अन् कंपनीनं शेवटी केला घात; म्हणाले उद्यापासून…. वाचून व्हाल थक्क CBSE बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल लवकरच यावेळी सुमारे 38 लाख विद्यार्थी CBSE बोर्डाच्या 10वी, 12वीच्या परीक्षेत बसले होते. बोर्ड लवकरच निकाल जाहीर करू शकेल. तथापि, CBSE ने बोर्ड परीक्षा 2023 च्या निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. CBSE, cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केले जातील. याशिवाय विद्यार्थी डिजीलॉकरवरही निकाल पाहू शकतात. एसएमएस आणि उमंग अॅपवरही निकाल पाहता येईल. IT सेक्टरमध्ये जॉबची सर्वात मोठी संधी; Accenture कंपनीत भरतीची मोठी घोषणा; करा अप्लाय असा चेक करा CBSE बोर्ड निकाल 2023 विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in ला भेट देतात. निकाल जाहीर झाल्यानंतर 10वी आणि 12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. रोल नंबर टाकून सबमिट करा. परिणाम तुमच्या स्क्रीनवर दिसेल. ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स; ‘या’ विद्यापीठात मिळेल 35,000 रुपये पगार; करा अप्लाय यावर्षी सीबीएसईने एकाच टर्ममध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या. 15 फेब्रुवारी 2023 पासून 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या. आणि प्रात्यक्षिक परीक्षा 2 जानेवारी 2023 पासून सुरू झाल्या. 2022 मध्ये, CBSE ने दोन टर्ममध्ये बोर्ड परीक्षा आयोजित केली गेली होती.