मुंबई, 05 मे: टेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर वाईट काळ सुरू आहे. गेल्या वर्षीपासून सुरू झालेलं ले ऑफचं चक्र अद्यापही थांबलेलं नाही. गुगल, मेटा ते मायक्रोसॉफ्टपर्यंत मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. पण, अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी कंपनीने ज्या पद्धतीने कर्मचार्यांना कामावरून काढलं ते अगदी अनोखे आहे. ज्या पद्धतीनं कर्मचायांना कामावरून काढण्यात आली हे वाचून तुमचीही तळपायाची आग डोक्यात गेल्याशिवाय राहणार नाही. कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यापूर्वी कंपनीने त्यांच्या स्वागतासाठी एक भव्य पार्टी आयोजित केली होती. तिथे कर्मचाऱ्यांना ब्रँडेड पेयांसह चविष्ट जेवण देण्यात आले. पार्टीनंतर लगेचच कंपनीने आपल्या निम्म्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याचे आदेश दिले. हे ऐकून सर्वच कर्मचारी शॉक झाले पण कंपनीचा आदेश तो शेवटचा.
टेकक्रंचच्या अहवालानुसार, यूएस स्थित सायबर सुरक्षा फर्म बिशप फॉक्स म्हणतात की कंपनीचा व्यवसाय स्थिर आणि मजबूत आहे, परंतु जागतिक आर्थिक स्थिती चांगली नाही. हे पाहता कंपनीने आपला व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी आपली टीम कमी केली आहे. मात्र बिशप फॉक्सचे प्रवक्ते केविन कोश म्हणतात की कर्मचार्यांना काढून टाकण्यासाठी पार्टी आयोजित केली गेली नव्हती. RSA सायबर सुरक्षा परिषद आधीच नियोजित होती. मात्र, या पार्टीसाठी कंपनीने किती पैसे खर्च केले हे सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे. IT सेक्टरमध्ये जॉबची सर्वात मोठी संधी; Accenture कंपनीत भरतीची मोठी घोषणा; करा अप्लाय बिशप फॉक्सच्या कर्मचार्यांना हे फारसे कळले नाही की कंपनीने कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. छाटलेले काही कर्मचारी आता सोशल मीडियावर आपली व्यथा मांडत आहेत. एका कर्मचाऱ्याने लिहिले की कंपनीने अनपेक्षित पाऊल उचलले आहे. सर्वजण आनंदाने पार्टीकडे वळले, मग अचानक कंपनीने छाटणीचा बॉम्ब टाकला. महिन्याचा तब्बल 70 हजार रुपये पगार; भारत सरकारच्या दूरसंचार विभागात जॉबची संधी सध्या अमेरिकेतील कंपन्यांची आर्थिक स्थिती बिघडत चालली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे. यामध्ये मात्र कर्मचाऱ्यांना अशा शॉकिंग प्रसंगांना सामोरं जावं लागतंय.