JOIN US
मराठी बातम्या / करिअर / SSC Result 2023: 10वीचा निकाल काहीही येऊ देत; करिअर पुढे न्यायचंय ना? मग 'हे' ऑप्शन्स ठरतील बेस्ट

SSC Result 2023: 10वीचा निकाल काहीही येऊ देत; करिअर पुढे न्यायचंय ना? मग 'हे' ऑप्शन्स ठरतील बेस्ट

Ssc Result 2023 Updates In Marathi: दहावी पास उमेदवारांसाठीही Career बरेच ऑप्शन्स आहेत ज्यामध्ये पगारही चांगला आहे. आज आम्ही तुम्हाला दहावीनंतरच्या अशाच काही करिअर ऑप्शन्सबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

जाहिरात

'हे' ऑप्शन्स ठरतील बेस्ट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मे: बरेचदा काही अडचणींमुळे किंवा घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थी शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. कधी आठवीपर्यंत तर कधी दहावीपर्यंत शिक्षण घेऊन जॉब करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते. जॉबसाठी आजच्या काळात प्रत्येकजण स्ट्रगल करत असताना दहावी पास उमेदवारांना कोण जॉब देणार? असे विचार मनात येतात. मात्र असं अजिबात नाही. महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (10th ssc result 2023 date) हा लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे दहावी पास उमेदवारांसाठीही Career बरेच ऑप्शन्स आहेत ज्यामध्ये पगारही चांगला आहे. आज आम्ही तुम्हाला दहावीनंतरच्या अशाच काही करिअर ऑप्शन्सबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. स्किल्समुळे होईल तयारी तुम्ही सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या रोजगाराभिमुख कोर्सेसमध्येही सहभागी होऊ शकता, तिथे तुम्हाला टायपिंग, शिवणकाम, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक, कॉम्प्युटर, मशिनिस्ट इत्यादी विषयांची माहिती मिळेल. त्यानंतर तुम्हाला रोजगाराच्या चांगल्या संधी मिळू शकतात. अशा अभ्यासक्रमांची माहिती तुम्ही तुमच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रातून मिळवू शकता. काही जिल्हास्तरावर जिल्ह्याच्या लीड बँकेकडूनही असे अभ्यासक्रम चालवले जातात. Maharashtra SSC Result 2023: स्टेट बोर्डाच्या 10वीच्या निकालाबाबत सर्वात मोठी बातमी; ‘या’ तारखेला लागणार रिझल्ट? भारतीय सैन्यात नोकरीची संधी तुम्ही भारतीय सैन्यात 10वीच्या निकालानंतर (Maharashtra SSC Result 2023) नंतर सैनिकासाठी अर्ज करू शकता, या पदासाठी तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे आणि शारीरिक निकष देखील पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्ही आमची ही पोस्ट वाचा: भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी काय करावे लागेल? रेल्वेत जॉब्स जर तुम्हाला रेल्वेत नोकरी करायची असेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज देखील करू शकता. रेल्वेमध्ये 10वी पाससाठी काही पदे देखील आहेत, ज्यासाठी वेळोवेळी भरती केली जाते जिथे तुम्ही अर्ज करू शकता. 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल 12,000 जागांसाठी बंपर भरती; करा अप्लाय बँकेत नोकरी जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल, तर तेथे अधीनस्थ कर्मचाऱ्यांची भरती केली जाते, ज्यासाठी दहावी पासची मागणी केली जाते. यानुसार तुम्ही अर्ज करून बँकेत नोकरी करू शकता. हे पर्याय येतील कामी या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही काम करायचे असेल तर तुम्हाला तांत्रिक ज्ञान आवश्यक असेल ज्यासाठी तुम्ही कोणाच्या दुकानात किंवा कोणत्याही कारखान्यात इ. कोणत्याही अनुभवाशिवाय काम सुरू करू शकता. तुम्हाला या ठिकाणी खूप कमी पगार मिळेल, पण तुम्ही कोणत्याही एका कामात प्रभुत्व मिळवू शकता. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कामात अडकता तेव्हा तुमचा पगारही वाढतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या