मुंबई, 27 मे: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला आहे. नेहमीपेक्षा हा निकाल लवकर जाहीर करण्यात आला आहे. मात्र यामुळे आता दहावीची बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं आहे. आपला निकाल कधी येणार? कसा लागणार? कोणत्या तारखेला निकाल जाहीर होणार? याचाच विचार सध्या विद्यार्थी आणि पालक करत आहेत. पण आज दहावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. 2 ते 25 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा आहेच. महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in. या वेबसाईटवर जाऊन निकाल चेक करता येणार आहे. News18Lokmat च्या वेबसाईटवरही हा निकाल पाहता येणार आहे. त्यासाठी आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्यावर एक लिंक येईल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही निकाल पाहू शकता.
10वी, 12वीनंतर टॉपला न्यायचंय करिअर? मग निकालाची वाट बघू नका; आताच सुरु करा ‘हे’ कोर्सेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल येत्या काही दिवसातच जाहीर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होणार आहे. बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र हा निकाल येत्या आठवड्यतच जारी केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. News18 लोकमत वर थेट बघता येईल निकाल सुरुवातीला News18 लोकमत च्या करिअर section मधील कोणतीही लिंक ओपन करा. यानंतर तुम्हाला बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट करायचं आहे. यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे. यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे. IMP Documents for Admission: लक्ष द्या! ‘ही’ महत्त्वाची कागदपत्रं नसतील तर प्रवेशामध्ये येईल अडचण; तुमच्याकडे आहेत ना? निकालानंतर सर्वात आधी तपासा या गोष्टी निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.