JOIN US
मराठी बातम्या / करिअर / स्टार्टअप सुरु करायचंय पण भांडवल नाहीये? चिंताच करू नका; पुणे विद्यापीठ देईल सीड फंड

स्टार्टअप सुरु करायचंय पण भांडवल नाहीये? चिंताच करू नका; पुणे विद्यापीठ देईल सीड फंड

आता पुणे विद्यापीठाकडून स्टार्टअप सुरु करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना किंवा फर्म्सना सीड फंड (SPPU will provide seed fund to start ups) दिला जाणार आहे तशी घोषणा पुणे विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.

जाहिरात

पुणे विद्यापीठ देईल सीड फंड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 जुलै: आजकाल देशात स्टार्टअपचा मोठा ट्रेंड (Startup trend in India) दिसून येतो आहे. आपल्या नवनवीन आयडियासोबत अनेक जण StartUp सुरु करायचा विचार करता आहेत. देशातील अनेक स्टार्टअप्स यशस्वीही (Successful start ups in India) झाले आहेत. मात्र स्टार्टअप सुरु करायचं म्हंटलं की यासाठी लागतं प्रचंड भांडवल (How to raise funds for startups). सगळ्यांकडेच स्टार्टअप सुरु करण्यासाठी पैसे असतीलच असं नाही. पैसे नसल्यामुळे अनेक बिझिनेस आयडिया (Best start up ideas) सुरूच होऊ शकत नाहीत. मात्र या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून आता पुणे विद्यापीठाकडून स्टार्टअप सुरु करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना किंवा फर्म्सना सीड फंड (SPPU will provide seed fund to start ups) दिला जाणार आहे तशी घोषणा पुणे विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. ‘पुणेकर न्यूज’या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’ ला स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत पाच कोटींचा सीड फंड प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता पुणे विद्यापीठाकडून गरजू स्टार्टअप्सना हा सीड फंड दिला जाणार आहे. JOB ALERT: शिक्षकांसाठी पुण्यात बंपर जॉब ओपनिंग्स; परीक्षा न देता थेट मिळेल जॉब

काय आहे SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’ ही संस्था या माध्यमातून स्टार्टअप ना मार्गदर्शन करणे, नवउद्योजक घडविण्यासाठी मार्गदर्शन करणे, स्टार्टअप ना निधी उपलब्ध करुन देणे आदी विषयात काम करते. केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ कार्यक्रमांतर्गत ‘सीड फंड स्कीम’ च्या माध्यमातून फाऊंडेशनला हा निधी प्राप्त झाला आहे. चांगल्या स्टार्टअप ना बळ मिळावे यासाठी ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना कामावरून का काढलं? Byju’s नं अखेर सांगितलं मोठं कारण कोणाला मिळणार याद्वारे फंड या सीड फंडसाठी कोणतीही नोंदणीकृत कंपनी, ग्रुप किंवा स्वतंत्र व्यक्ती अर्ज करू शकणार आहेत. ज्यांच्याकडे स्टार्टअपची उत्तम आयडिया आहे अशी कंपनी ग्रुप किंवा स्वतंत्र व्यक्ती अर्ज करू शकणार आहेत. Concept, Production Development, Production Chaining, Market Entry and Commercialization या विभागातील स्टार्टअप्सना हे फंड उपलब्ध होणार आहे. हे फंड मिळवण्यासाठी इतर पात्रतेच्या अटी काय आहेत हे https://seedfund.startupindia.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन समजू शकणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या