मुंबई, 23 ऑगस्ट: सध्याच्या काळात बहुतांश कंपन्या (Companies) आपल्या कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या भरपूर सुविधा (Facilities) देतात. कर्मचाऱ्यांच्या श्रमातून कंपनीला फायदा व्हावा, असा यामागचा उद्देश असतो. अलीकडच्या काळात कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये दुपारच्या वेळी झोप घेण्यासाठी परवानगीबाबतचा मुद्दा जोरदार चर्चेत आला आहे. ऑफिसमध्ये लंच झाल्यानंतर जेव्हा कर्मचारी येऊन आपल्या जागेवर बसतात, तेव्हा बहुतेक कर्मचाऱ्यांना खूप झोप (Sleep) येते किंवा त्यांना आहे तिथचं झोपावसं वाटतं. परंतु, कामाच्यावेळी झोप लागणं जवळपास अशक्य असतं. बॉसनं झोपताना बघितलं तर तो खडसवाणार हे नक्की असतं किंवा अनेकदा अशा निष्काळजीपाणामुळे नोकरी जाण्याचीदेखील शक्यता असते. पण नुकतंच एक संशोधन समोर आलं आहे, ज्यामध्ये काही आश्चर्यकारक दावे करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना कामावर झोपू दिल्यानं कंपनीला फायदा होतो, असं स्लीप एक्सपर्ट्सचं (Sleep Experts) म्हणणं आहे. चीनमध्ये दुपारी लंचनंतर कर्मचाऱ्यांचं झोपणं ही सर्वसामान्य गोष्ट मानलं जाते. कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम केल्याने, त्यांना झोप आल्याचं समजलं जातं. WFH संपलं पण ऑफिसमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नाही? टेन्शन नको; ‘या’ क्षेत्रांमध्ये घरूनच करता येईल काम `डेली स्टार`ने दिलेल्या वृत्तानुसार नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या रुथ लीऑंग आणि मायकल ची यांच्या मते, ``दिवसा झोप ही मानवी शरीराची गरज आहे आणि ती जीवनाचा एक भागदेखील आहे. दिवसभरात शरीराला थकवा जाणवू लागतो आणि झोपही येते. अशावेळी कर्मचाऱ्यांना झोपू दिलं तर त्यांची उत्पादकता (Productivity) वाढेल आणि कंपनीचा नफाही (Profit) वाढेल.`` झोपेमुळे वाढते कर्मचाऱ्यांची Productivity ऑफिसमध्ये लंच झाल्यानंतर झोप घेण्याचे फायदे 50 हून अधिक लोकांवर संशोधन करून जाणून घेण्यात आले. हा कॉग्निटिव्ह इफेक्ट ऑफ नॅपचा (Cognitive Effect Of Nap) एक भाग होता. कर्मचाऱ्यांचे वय कितीही असो, झोपेमुळे त्यांच्या कार्यशैलीत आणि उत्पादकतेत फरक पडतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. अशा प्रकारचं संशोधन सध्या केलं जात असलं तरी चीनमध्ये ही गोष्ट फार पूर्वीपासून प्रचलित आहे, ही बाब आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; BEL मुंबईत ‘या’ पदांसाठी भरती काम करताना झोपणं ही चीनमध्ये आहे सामान्य गोष्ट चीनमध्ये (China) काम करताना झोपणं चांगलं मानलं जातं. चीनमध्ये जे लोक कामाच्या दरम्यान झोप घेतात, असे लोक कठोर परिश्रम करतात आणि त्यामुळे त्यांना झोप येते, असं समजलं जातं. बिझनेस इन्सायडर वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, चीनमधल्या इंटरनेट कंपन्यांमध्ये मागील सहा ते सात वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर ग्रोथ होताना दिसत आहे. त्यामुळे कर्मचारी जादा काम करत आहेत. अशा परिस्थितीत दुपारी लंचनंतर झोपणं किंवा रात्रीच्या वेळी ऑफिसमध्येच झोपणं हे कंपन्यांमध्ये सामान्य झालं आहे.