स्टेट बँक ऑफ इंडिया
मुंबई, 08 नोव्हेंबर: आजकाल सरकारी नोकरी मिळणं अनेकांसाठी स्वप्नवत झालं आहे. त्यातही बँकेत नोकरी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. कारण बँकेतील नोकरी ही सुरक्षित नोकरी अनेकजण मानतात. त्यातही सरकारी बँकेत नोकरी लागली तर करिअरची चिंता आयुष्यभरासाठी मिटली, असंच समजलं जातं. म्हणूनच बँकेत नोकरी हवी असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वांत मोठी सरकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियानं सर्कल बेस्ड ऑफिसर्स पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्कल बेस्ड ऑफिसर्सच्या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे. याचाच अर्थ या पदासाठी अर्ज करण्यासाठी आज,सोमवारी शेवटची संधी असून, ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांन अद्याप अर्ज केलेला नाही, ते एसबीआय बँकेची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. Career Tips: मेहनत कमी आणि पगार जास्त; ‘या’ टॉप क्षेत्रांमध्ये करिअर केलंत तर करिअर होईल सेट याशिवाय, उमेदवार https://ibpsonline.ibps.in/sbicbosep22/ या लिंकवर क्लिक करूनसुद्धा या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी एसबीआयच्या भरती प्रक्रियेची अधिक माहितीही उमेदवारांना बँकेनं काढलेल्या अधिकृत अधिसूचनेवर पाहता येईल. त्यानुसार या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 1,422 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सुरुवात 18 ऑक्टोबर 2022 रोजी झाली होती. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे. सर्कल बेस्ड ऑफिसर्स पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन पूर्ण केलेला उमेदवार अर्ज करू शकतो. तसंच उमेदवाराला किमान 2 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असण्याची आवश्यकता आहे. या शिवाय, उमेदवारांची किमान वयोमर्यादा 21 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 30 वर्षे असावी. महिन्याचा तब्बल 70,000 रुपये पगार आणि एकही परीक्षा न देता नोकरी; पुण्यात बंपर जॉब ओपनिंग्स बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. त्यासाठी दररोज तासनतास अभ्यास करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण बऱ्याचवेळा कोणत्या बँकेत कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे, याची माहिती वेळेवर न मिळाल्यानं नोकरीची संधी हातातून जाण्याचीही शक्यता आहे. अशावेळी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी बँकेत होणाऱ्या भरती प्रक्रियेबाबत सतत अपडेट राहणे फायद्याचं ठरु शकते. आता एसबीआय बँकेत सुद्धा तब्बल 1422 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, या पदासाठी अर्ज करण्याची 7 नोव्हेंबर 2022 रोजी शेवटची मुदत असल्यानं ही मुदत संपण्यापूर्वी इच्छुकांनी अर्ज करण्याची गरज आहे.