जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: मेहनत कमी आणि पगार जास्त; 'या' टॉप क्षेत्रांमध्ये करिअर केलंत तर करिअर होईल सेट

Career Tips: मेहनत कमी आणि पगार जास्त; 'या' टॉप क्षेत्रांमध्ये करिअर केलंत तर करिअर होईल सेट

करिअर होईल सेट

करिअर होईल सेट

आज आम्ही तुम्हाला अशा काही करिअर ऑप्शन्सबद्दल सांगणार आहोत जिथे स्पर्धा कमी आणि करिअर घडवण्याची संधी मोठी आहे. चला तर मग जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07 नोव्हेंबर: अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा बँकिंगसारखे पर्याय सदाबहार आहेत, ज्यांची लोकप्रियता संधींच्या उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये कायम आहे. पण बदलत्या काळानुसार अशा पर्यायांचाही करिअरच्या पर्यायांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे, ज्यांचा आधी विचारही केला जात नव्हता किंवा त्यात फारसा वाव दिसत नव्हता. नवीन असल्याने त्यांच्यात तुलनेने कमी स्पर्धा आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी अधिक संधी आहेत.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही करिअर ऑप्शन्सबद्दल सांगणार आहोत जिथे स्पर्धा कमी आणि करिअर घडवण्याची संधी मोठी आहे. चला तर मग जाणून घेऊया. अ‍ॅडव्हेंचर्स टुरिझम ट्रॅकिंग, पर्वतारोहण अभ्यासक्रम, रॉक क्लाइंबिंग, स्कूबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग इत्यादी विविध उपक्रम साहसी पर्यटनांतर्गत येतात. याशी संबंधित तज्ञांना साहसी क्रीडा प्रशिक्षक म्हणतात, ज्यांना पर्यटन विभाग, साहसी क्रीडा क्लब, रिसॉर्ट्स इत्यादींमध्ये संधी मिळते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, गोवा www.niws.nic.in नेहरू इंस्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग, उत्तराखंड www.nimindia.net इथे हा कोर्स तुम्ही करू शकता. WCL Recruitment: 1-2 नव्हे तब्बल 1216 जागांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब्स; 12वी पाससाठी बंपर भरती पेट स्टायलिंग पाळीव प्राणी स्टायलिंग पाळीव प्राण्यांचे आरोग्य, त्यांचा आहार, त्यांचे राहण्याचे ठिकाण, त्यांचे स्वरूप इत्यादींव्यतिरिक्त विविध गोष्टी पाळीव प्राण्याच्या स्टायलिस्टच्या कक्षेत येतात. स्कूपी स्क्रब, नवी दिल्ली, फुजी वूझी, बंगलोर इथे हा कोर्स तुम्ही करू शकता. महिन्याचा तब्बल 70,000 रुपये पगार आणि एकही परीक्षा न देता नोकरी; पुण्यात जॉब्स वुड टेक्नॉलॉजी फॅशन डिझायनिंगसारख्या आजच्या वातावरणात, फर्निचर उत्पादन हा देखील एक ग्लॅमरस व्यवसाय बनला आहे. यासंबंधीचे विविध अभ्यासक्रम वेगवेगळ्या संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ वुड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बंगलोर, सरकारी पॉलिटेक्निक, श्रीनगर इथे हा कोर्स तुम्ही करू शकता. NEET UG 2023: नक्की कसं असेल परीक्षेचं पॅटर्न आणि काय आहेत लेटेस्ट अपडेट्स; इथे मिळेल संपूर्ण माहिती मास्टर इन कम्युनिकेशन कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी MC (M. Sc.) ची असते, मग तो टीव्हीवर प्रसारित होणारा कार्यक्रम असो किंवा थेट कार्यक्रम असो. जर संभाषण कौशल्य चांगले असेल, तुम्हाला एकापेक्षा जास्त भाषा येत असतील आणि तुमच्याकडे लोकांना गुंतवून ठेवण्याची क्षमता असेल, तर तुम्ही या दिशेने पावले टाकू शकता. यशस्वी होण्यासाठी योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली, पुणे इथे हा कोर्स तुम्ही करू शकता. एकही परीक्षा नाही; महिन्याला तब्बल 1,20,000 रुपये पगार; एअर इंडियामध्ये थेट नोकरीची संधी एअरपोर्ट मॅनेजमेंट विमानतळ व्यवस्थापनाशी संबंधित प्रशिक्षित व्यावसायिकांची मागणी सातत्याने वाढत आहे. या अंतर्गत कस्टमर केअर, तिकीट, फ्रंट ऑफिस, हॉस्पिटॅलिटी इत्यादी क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. एव्हलॉन अकादमी, मुंबई आणि इतर केंद्रे, अण्णा विद्यापीठ, चेन्नई इथे हा कोर्स तुम्ही करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात