JOIN US
मराठी बातम्या / करिअर / RBI Recruitment 2023 : रिझर्व्ह बँकेत बंपर भरती; वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पाहा

RBI Recruitment 2023 : रिझर्व्ह बँकेत बंपर भरती; वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पाहा

रिझर्व्ह बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) विविध विभागांमध्ये ग्रेड ‘B’ (DR) ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

जाहिरात

रिझर्व्ह बँकेत बंपर भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 10 मे : रिझर्व्ह बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) विविध विभागांमध्ये ग्रेड ‘B’ (DR) ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जून आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट chances.rbi.org.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेत किती रिक्त जागा आहे, त्या कोणत्या पदांसाठी आहेत, अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा किती आहे व अर्ज करण्याची प्रक्रिया तसेच अंतिम तारखेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. या संदर्भात ‘टेलिग्राफ इंडिया’ने वृत्त दिलं आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 291 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यापैकी 222 रिक्त पदं ग्रेड ‘B’ (DR)- जनरल मधील अधिकारी पदांसाठी आहेत, 38 रिक्त पदं ग्रेड ‘B’ (DR)- DEPR मधील अधिकारी पदासाठी आहेत आणि ग्रेड ‘B’ (DR)- DSIM मधील अधिकारी पदासाठी 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 मे 2023 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावं. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी कोणती वेबसाईट आहे, याबद्दल जाणून घेऊयात. Indian Oil Corporation Recruitment: गलेलठ्ठ पगाराची नोकरी, लिमिटेड जागा; ही संधी सोडू नका RBI Grade B Recruitment 2023 साठी अर्ज कसा करायचा - अधिकृत वेबसाइट- chances.rbi.org.in वर जा - होम पेजवर करंट व्हॅकेंसीजवर क्लिक करा. - डायरेक्ट रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ऑफिसर्स इन Grade ‘B’ (Direct Recruit-DR) (On Probation-OP) (General/DEPR/DSIM) Streams - Panel Year 2023” यावर क्लिक करा. - IBPS पोर्टलवर रजिस्टर करा - अर्ज पूर्ण भरा व आवश्यक असलेली कागदपत्रं सबमिट करा. - अॅप्लिकेशन फी भरा. - अर्ज सबमिट केल्यावर त्याची एक प्रिंटआऊट घ्या, ती तुम्हाला कामी येईल. - अर्जाची फी GEN/OBC/EWS साठी 850 रुपये आणि SC/ST/PwBD साठी 100 रुपये आहे. तुम्ही संबंधित पदांसाठी पात्रतेच्या अटी पूर्ण करत असाल, व अर्ज करण्यास इच्छुक असाल तर वर दिलेल्या पद्धतीनुसार तुम्ही ऑनलाइन अप्लाय करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जून आहे. हे विसरू नका. तसेच या संदर्भात इतर तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही ऑफिशिअल वेबसाइट तपासू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या