मुंबई : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) त्यांच्या विविध विभागांमध्ये अनेक नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेत एकूण 65 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या जागा रिफायनरी/पेट्रोकेमिकल युनिट हल्दिया (पश्चिम बंगाल) आणि अॅक्रेलिक आणि ऑक्सो अल्कोहोल फॅसिलिटी बडोदा (गुजरात), इथं भरल्या जातील. इच्छुक उमेदवार IOCL च्या अधिकृत वेबसाइट- https://iocl.com/ वरून अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मे आहे. या पदांसाठी 25,000 रुपये ते 1,05,000 रुपये वेतन दिले जाणार आहे.
लोकांना नोकरी देणाऱ्या कंपनीचा कर्मचाऱ्यांना Email, एका रात्रीत सगळं संपलंअर्ज कसा करायचा - IOCL च्या https://iocl.com/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. - Apply Online लिंकवर क्लिक करा. - ज्या रिफायनरी किंवा पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, ते निवडा. - अर्ज भरण्यासाठी आवश्यक तपशील अर्जात भरा. - सर्व डिटेल्स प्रिव्ह्यू करून तपासून घ्या. - अर्जाची फी भरा. - अर्ज सबमिट करा. - अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंटआऊट घ्या. उमेदवारांनी त्यांची कागदपत्रे त्यांनी अर्ज केलेल्या रिफायनरीला पोस्टाने पाठवणे आवश्यक आहे. कागदपत्रांमध्ये अर्जाची प्रिंटआउट, फोटो आणि इतर व्हेरिफाईड डॉक्युमेंट्स जसं की हायस्कूल मार्क शीट, एज्युकेशन डिग्री, एक्स्पिरियन्स लेटर आणि इतरांचा समावेश असावा. डॉक्युमेंट्स, पात्रता आणि रिक्त जागांच्या इतर तपशीलांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी IOCLने त्यांच्या वेबसाइटवर जारी केलेली अधिकृत अधिसूचना वाचावी. रिक्त जागांचे तपशील ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट-IV (प्रॉडक्शन) - गुजरात - 47, हल्दिया -07, P&U गुजरात-7, P&U हल्दिया-4
SEEPZ Recruitment: स्पेशल इकॉनॉमिक्स झोन मुंबईमध्ये बंपर ओपनिंग्स; ‘या’ पदांसाठी आताच करा अप्लायनिवड प्रक्रिया IOCL लेखी आणि स्किल टेस्टच्या आधारे उमेदवारांची निवड करेल. प्रश्नपत्रिकेत विशिष्ट विषयांचे प्रश्न, न्युमरिकल अॅबिलिटी व जनरल अवेअरनेसबद्दलचे प्रश्न असतील. प्रत्येक विभागातील गुणांचे डिस्ट्रिब्युशन अनुक्रमे 75, 15 आणि 10 आहे. स्किल टेस्टसाठी पात्र होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळवावे लागतील. अधिसूचनेनुसार, बडोदा गुजरात रिफायनरीतील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी लेखी परीक्षेचे आयोजन करेल. या व्यतिरिक्त, हल्दिया रिफायनरीमधील जागांसाठी अर्जदारांची लेखी परीक्षा कोलकाता इथं घेतली जाईल. उमेदवारांना त्यांच्या अॅडमिट कार्डद्वारे परीक्षा केंद्राच्या स्थानाची सूचना दिली जाईल. तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून अर्ज करू शकता. इतर माहितीसाठी तुम्ही अधिकृत अधिसूचना वाचा.