JOIN US
मराठी बातम्या / करिअर / पासपोर्ट ऑफिसमध्ये उच्च पदावर काम करण्याची सुवर्णसंधी; मिळेल लाखो रुपये पगार

पासपोर्ट ऑफिसमध्ये उच्च पदावर काम करण्याची सुवर्णसंधी; मिळेल लाखो रुपये पगार

पासपोर्ट ऑफिसनं प्रतिनियुक्तीवर पासपोर्ट ऑफिसर आणि डेप्युटी पासपोर्ट ऑफिसर या पदांसाठी पात्र भारतीय उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पासपोर्ट ऑफिस 2023 भरतीच्या अधिसूचनेनुसार एकूण नऊ रिक्त जागांसाठी कर्मचारी भरती केली जाणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 एप्रिल: भारतामध्ये दरवर्षी लाखो पर्यटकांची आणि परदेशी नागरिकांची ये-जा सुरू असते. यासंबंधीच्या सर्व कायदेशीर बाबी परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या विविध विभागांना हाताळाव्या लागतात. सर्वांत महत्त्वाची जबाबदारी पासपोर्स विभागावर असते. आपला कारभार सुरळीत चालावा यासाठी या विभागाला वेळोवेळी मनुष्यबळाची गरज भासत असते. आताही पासपोर्ट ऑफिसनं प्रतिनियुक्तीवर पासपोर्ट ऑफिसर आणि डेप्युटी पासपोर्ट ऑफिसर या पदांसाठी पात्र भारतीय उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पासपोर्ट ऑफिस 2023 भरतीच्या अधिसूचनेनुसार एकूण नऊ रिक्त जागांसाठी कर्मचारी भरती केली जाणार आहे. ‘स्टडी कॅफे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. निवडलेल्या उमेदवारांची तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली जाईल. डेप्युटी पासपोर्ट ऑफिसर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीला संबंधित पासपोर्ट ऑफिसच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही पीएसकेमध्ये पोस्ट केलं जाऊ शकतं किंवा कार्यात्मक कारणास्तव भारतभरातील इतर कोणत्याही पासपोर्ट कार्यालयात त्यांची बदली केली जाऊ शकते. ESIC Recruitment 2023 : सरकारी नोकरीची संधी! 1 लाखांपेक्षा जास्त पगार पासपोर्ट ऑफिस 2023 भरती अधिसूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवारांना 209200 रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळेल. 56 वर्षांपेक्षा जास्त वयाचे उमेदवार या नोकरीच्या पदासाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना शेवटच्या तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सर्व संबंधित कागदपत्रांसह योग्यरित्या भरलेला अर्ज पाठवावा लागेल. अधिसूचना जारी झाल्यापासून 45व्या दिवसापर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. पोस्टचं नाव आणि संख्या: पासपोर्ट ऑफिस 2023 भरती अधिसूचनेनुसार, पासपोर्ट ऑफिसर पदाच्या दोन आणि डेप्युटी पासपोर्ट ऑफिसर पदाच्या नऊ जागा रिक्त आहेत. त्यासाठी कर्मचारी भरती केली जाणार आहे. पात्रता : पासपोर्ट ऑफिसर: इच्छुक उमेदवार मुख्य केडर किंवा डिपार्टमेंटमध्ये कायमस्वरूपी अ‍ॅनॉलॉगस पोस्टवर कार्यरत असावा किंवा, पे मॅट्रिक्सच्या लेव्हल-11 मधील पाच वर्षांच्या सेवेसह किंवा समतुल्य, पेरेंट केडर किंवा विभागात नियमितपणे नियुक्ती झालेली पाहिजे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी आणि पासपोर्ट, कॉन्सुलर, इमिग्रेशन अॅडमिनिस्ट्रेशन, फायनान्स अकाउंट्स, व्हिजिलन्स वर्क किंवा सार्वजनिक तक्रारी इत्यादींमध्ये नऊ वर्षांचा अनुभव असावा. डेप्युटी पासपोर्ट ऑफिसर: इच्छुक उमेदवार मुख्य केडर किंवा डिपार्टमेंटमध्ये कायमस्वरूपी अ‍ॅनॉलॉगस पोस्टवर कार्यरत असावा किंवा, पे मॅट्रिक्सच्या लेव्हल-10 मधील पाच वर्षांच्या सेवेसह किंवा समतुल्य, पेरेंट केडर किंवा विभागात नियमितपणे नियुक्ती झालेली पाहिजे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी आणि पासपोर्ट, कॉन्सुलर, इमिग्रेशन अॅडमिनिस्ट्रेशन, फायनान्स अकाउंट्स, व्हिजिलन्स वर्क किंवा सार्वजनिक तक्रारी इत्यादींमध्ये पाच वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा: पासपोर्ट ऑफिस 2023 भरती अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवारांचं वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसलं पाहिजे. वेतन: पासपोर्ट ऑफिसर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला पे स्केल लेव्हल 12 नुसार 78 हजार 800 रुपये ते 2 लाख 9 हजार 200 रुपये मासिक वेतन मिळेल. डेप्युटी पासपोर्ट ऑफिसर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला पे स्केल लेव्हल 11 नुसार 67 हजार 700 रुपये ते 2 लाख 8 हजार 700 रुपये मासिक वेतन मिळेल. कार्यकाळ: पासपोर्ट ऑफिस 2023 भरती अधिसूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवारांची तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली जाईल. अर्ज कसा करावा? इच्छुक आणि पात्र उमेदवारांना शेवटच्या तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सर्व संबंधित कागदपत्रांसह योग्यरित्या भरलेला अर्ज पाठवावा लागेल. अधिसूचना जारी झाल्यापासून 45व्या दिवसापर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. अपूर्ण अर्ज किंवा शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेला अर्ज नाकारला जाईल. अर्ज पाठवण्याचा पत्ता: दीपक दास, अंडर सेक्रेटरी (PSP-IV)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या