नवी दिल्ली : डीन ऑफिस, कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC), तेलंगणा राज्य यांनी 40 रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात त्यांनी पात्रतेच्या अटी व निकष देत जाहिरात काढली आहे. 4 पदासांठी 40 रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून त्यांनी अर्ज मागवले आहेत. यासंदर्भात ‘स्टडी कॅफे’ने वृत्त दिलंय. जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार, सीनिअर रेसिडंट पदासाठी 29 जागा, सुपर स्पेशालिस्ट (सीनिअर लेव्हल)/ कन्सल्टंट पदासाठी 5 जागा, सुपर स्पेशालिस्ट (एंट्री लेव्हल)/ ज्युनिअर कन्सल्टंट पदासाठी जागा व स्पेशालिस्ट पदासाठी 3 जागा भरल्या जाणार आहेत. या सर्व पदासांठी वेतन वेगवेगळे आहे. या रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, निवड प्रक्रिया कशी असेल, तसंच कामाचं ठिकाण कोणतं असेल, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. ESIC रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांना दिलेल्या तारखेला वॉक-इन मुलाखतीसाठी यावं लागेल. ही प्रक्रिया ऑनलाइन नाही, तर ऑफलाइन असेल. भरल्या जाणाऱ्या सर्व जागांसाठी उमेदवारांची निवड सुरुवातीला फक्त एका वर्षाच्या कार्यकाळासाठी केली जाईल. त्यानंतर वर्षभरातील त्यांच्या समाधानकारक कामगिरीच्या आधारे तो कार्यकाळ तीन वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. टीप: तीन वर्षे सीनिअर रेसिडंट योजनेअंतर्गत सीनिअर रेसिडंट म्हणून काम केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. कोणत्याही सरकारी संस्थेत आधीपासून कार्यरत असलेल्या सीनिअर रेसिडंट्सनी चॅनेलद्वारे अर्ज करावा. त्यांच्या कामाचा एकूण कालावधी 3 वर्षांपेक्षा जास्त नसावा. सूचना: ESIC रिक्रुटमेंट 2023मधील भरतीसाठी पात्र उमेदवारांना अनुक्रमे 25, 26, 27 आणि 28 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या मुलाखतींमध्ये हजर राहण्यासाठी अर्ज करणे अनिवार्य आहे. पदांची नावं आणि रिक्त जागा ESIC Recruitment 2023 च्या अधिकृत जाहिरातीनुसार 4 पदांसाठी 40 जागा भरल्या जाणार आहेत. 1: सीनिअर रेसिडंट पोस्ट : 29 जागा ( विभाग - रेडिओलॉजी, अॅनेस्थेशिया, कार्डियालॉजी, सीटीव्हीएस, न्यूरॉलॉजी, पेडियाट्रिक सर्जरी, युरॉलॉजी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक क्रिटिकल केअर, नेफ्रॉलॉजी) 2: सुपर स्पेशालिस्ट (सीनिअर लेव्हल)/ कन्सल्टंट: 5 जागा (विभाग - कार्डियोलॉजी, सीटीव्हीएस, न्युरोलॉजी, पेडियाट्रिक सर्जरी) 3: सुपर स्पेशालिस्ट (एंट्री लेव्हल)/ ज्युनिअर कन्सल्टंट: 3 जागा (विभाग - कार्डियालॉजी, नेफ्रॉलॉजी व न्यूरो सर्जरी) 4: स्पेशालिस्ट: 3 जागा (विभाग - रेडिओलॉजी व अॅनेस्थेशिया) नोकरीचा कालावधी: सुरुवातीला 1 वर्ष, नंतर 3 वर्षांपर्यंत वाढवता येईल कामाचे ठिकाण - सनथनगर, हैदराबाद (राज्य - तेलंगणा) कोणत्या पदासाठी किती वेतन 1: सीनिअर रेसिडंट पोस्ट - पे स्केल- लेव्हल 11 2: सुपर स्पेशालिस्ट (सिनिअल लेव्हल)/कन्सल्टंट: 2.40 लाख रुपये प्रति महिना 3: सुपर स्पेशालिस्ट (एंट्री लेव्हल)/ ज्युनिअर कन्सल्टंट - 2 लाख रुपये प्रति महिना 4: स्पेशालिस्ट - 127141 रुपये प्रति महिना पदांसाठी कमाल वयोमर्यादा 1: सीनिअर रेसिडंट पोस्ट - 45 वर्षे 2: सुपर स्पेशालिस्ट (सीनिअर लेव्हल)/कन्सल्टंट - 69 वर्षे 3: सुपर स्पेशालिस्ट (एंट्री लेव्हल)/ ज्युनिअर कन्सल्टंट- 69 वर्षे 4: स्पेशालिस्ट - 66 वर्षे सरकारी नियमांनुसार रिझर्व्हड कम्युनिटी तसेच माजी सैनिकांसाठी वयात सवलत दिली जाईल. पदांसाठी शैक्षणिक पात्रतेच्या अटी भरती प्रक्रियेच्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत- पहिल्या तीन पदांसाठी शैक्षणिक पात्रता मेडिसिन बॅकलॅरियस, बॅकलॅरियस चिरुर्गी/ बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी (एमबीबीएस)/संबंधित स्पेशॅलिटीमध्ये डिप्लोमा. किंवा 2) मेडिसीने बॅकलॅरियस, बॅकलॅरियस चिरुर्गी/ बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी (एमबीबीएस) संबंधित स्पेशॅलिटीमध्ये 10 वर्षांच्या कामाचा अनुभव. चौथ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता: टिचर्स अॅबिलिटी क्वालिफिकेशन इन मेडिकल इन्स्टिट्युट रेग्युलेशन 2022 नुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (NMC अधिसूचना दिनांक 14 फेब्रुवारी 2022) सरकारी सेवेतील उमेदवाराने मुलाखतीच्या वेळी नियोक्त्याने दिलेले “ना हरकत प्रमाणपत्र” सादर करावे. सिलेक्शन क्रायटेरिया: सर्व पूर्णवेळ पदांसाठीची निवड वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीच्या आधारावर केली जाईल. नोटिफिकेशनमध्ये नमूद माहितीनुसार सर्व 4 पदांसाठी योग्य उमेदवारांच्या निवडीसाठी एक रीतसर स्थापन केलेली निवड समिती मुलाखत घेईल. निवडलेला उमेदवार सुरुवातीला 1 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करेल. नंतर त्याच्या कामाच्या आधारावर त्याचा कालावधी तीन वर्षांपर्यंत वाढवायचा की नाही, त्याचा निर्णय घेतला जाईल. ESIC रिक्रुटमेंट 2023 साठी अर्ज कसा करायचा रिक्रुटमेंट नोटिफिकेशनमध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीच्या ठिकाणी पूर्ण भरलेले अर्ज आणि इतर सर्व सेल्फ अटेस्टेड कागदपत्रांसह पोहोचावं. तुमच्याकडे मूळ कागदपत्रे व झेरॉक्स दोन्हीही असणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.