8. जर तुमच्या घरात पश्चिम आणि नैऋत्य कोनांमध्ये अभ्यासाची खोली बनवणे शक्य नसेल, तर तुम्ही ती ईशान्येलाही बांधू शकता.
मुंबई, 09 मार्च: कोरोना साथीच्या काळात (Coronavirus Pandemic) आयटी क्षेत्रातल्या (IT Sector) बहुसंख्य कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची म्हणजेच वर्क फ्रॉम होमची (Work from Home) सुविधा दिली. जवळपास दोन वर्षं आयटी क्षेत्रातले बहुसंख्य कर्मचारी याच पद्धतीने काम करत आहेत. अधिक वेळ काम, घराकडे, मुलांकडे लक्ष न देता येणं इत्यादी कारणांमुळे आयटीतली नोकरी सोडणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची संख्या 2021मध्ये त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास निम्म्याने कमी झाली आहे. आता अनेक कंपन्या रिमोट वर्क मॉडेलकडे (Remote Work Model) वळल्या असल्यानं काम करण्याच्या पद्धतीत लवचिकता मिळाली आहे. त्यामुळे हा बदल झाल्याचं एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे. अमेरिकेतल्या सेरामाउंट (Seramount) या व्यावसायिक सेवा देणाऱ्या कंपनीसह अवतार (Avatar) या संस्थेने केलेल्या संशोधनाची माहिती मनीकंट्रोलला (Moneycontrol) देण्यात आली आहे. त्यानुसार मनीकंट्रोलने हे वृत्त दिलं आहे. यात आयटी आणि आयटीईएस (IT/ITes) क्षेत्रातल्या महिलांचं नोकरी सोडण्याचं प्रमाण (Women Attrition Rate in IT sector) याचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार, व्यवस्थापकीय स्तरावर (Managerial Level) नसलेल्या महिला कर्मचाऱ्यांचं नोकरी सोडण्याचं प्रमाण सुमारे 40 टक्क्यांनी कमी झालं आहे. वरिष्ठ स्तरावरच्या व्यवस्थापकीय आणि कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह स्तरावरच्या नोकऱ्या सोडण्याचं प्रमाण 20 टक्क्यांनी घटलं आहे. महिलांनो, Google मध्ये तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी; या लिंकवर करा Apply आयटी क्षेत्र हे महिलांना रोजगार देणारं देशातलं सर्वांत मोठं क्षेत्र आहे. त्यामुळे त्याचं महत्त्व अन्यनसाधारण आहे. या क्षेत्रात काम करत असलेल्या 50 लाख कर्मचाऱ्यांमध्ये एक चतुर्थांशपेक्षा जास्त महिला कर्मचारी आहेत. या क्षेत्रातल्या कंपन्यांचे प्राधान्य असलेल्या घटकांमध्ये विविधता हा महत्त्वाचा घटक आहे. कोरोना साथीच्या काळात रिमोट वर्किंग म्हणजे घरून काम करण्याची आणि कामाची वेळही सोयीची ठरण्याची सुविधा प्रचलित झाल्यानं आता या क्षेत्रात महिलांसाठी आणखी संधी खुल्या झाल्या आहेत. घरून ऑफिसचं काम करता येत असल्यानं ऑफिस आणि घर ही तारेवरची कसरत करण्याची चिंता कमी झाल्यानं आता या क्षेत्रातील महिला नोकरी सोडण्याचं प्रमाण कमी झालं आहे. घरून काम करण्यामुळे महिलांवर काय परिणाम होत आहे, हे समजून घेण्यासाठी ऑगस्ट 2020 मध्ये, हेक्झावेअर टेक्नोलॉजिजनं (Hexaware Technologies) एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात असं आढळून आलं होतं, की घरी बसून काम करणाऱ्या महिलांवर याचा नकारात्मक परिणाम होत आहे. काम आणि घर या दोन्ही आघाड्यांवरच्या दबावामुळे त्यांच्यावर अधिक ताण येत आहे. त्या वेळी हेक्झावेअरचे सीईओ आर. श्रीकृष्ण यांनी मनीकंट्रोलशी संवाद साधताना सांगितलं होतं, की महिला कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण दुप्पट, तिप्पट वाढला आहे. मार्च 2021 च्या एका अहवालात असं आढळलं, की घरून काम करण्याच्या पद्धतीमुळे 10 पैकी चार महिलांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळताना ताणतणावाचा (Stress) सामना करावा लागत आहे. काही अधिकारी आणि महिला कर्मचार्यांनी तेव्हा म्हटलं होतं, की दोन्ही आघाड्यांवरचा दबाव महिलांसाठी ब्रेकिंग पॉइंट ठरू शकतो. यामुळे या क्षेत्रातल्या महिलांचा सहभाग वाढण्याऐवजी कमी होऊ शकतो. HR मुलाखतीदरम्यान विचारले जाऊ शकतात ‘हे’ प्रश्न; अशा पद्धतीनं द्या उत्तरं त्याच वेळी, टीमलीज सर्व्हिसेस (Teamlease Services) कंपनीच्या कार्यकारी उपाध्यक्षा ऋतुपर्णा चक्रवर्ती म्हणाल्या, की कोविड-19 मुळे कामाच्या बदललेल्या पद्धतीमुळे महिलांना कुठूनही काम करण्याची मुभा दिली जात आहे. त्यामुळे त्यांचा या क्षेत्रातला सहभाग वाढण्याची संधी निर्माण झाली आहे. ‘मातृत्वानंतर करिअर सोडलेल्या महिलादेखील आता पुन्हा कामाकडे वळताना दिसत आहेत. कारण कंपन्या त्यांना कामाचं ठिकाण, वेळ याबाबत अधिक सोयीस्कर पद्धतीने काम करण्याची मुभा देत आहेत. महिलांना नोकरीवर घेण्यात वाढ झाली असून कोरोना साथीच्या आधीच्या काळातल्या प्रमाणाइतकंच सध्याचं प्रमाण दिसत आहे,’ असं ऋतुपर्णा चक्रवर्ती यांनी सांगितलं. याचाच अर्थ नोकरी सोडण्याचं प्रमाण कमी झाले असून, आयटी क्षेत्रात महिलांचा कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढत आहे, असा होतो. अवतार आणि सेरामाउंट यांनी तयार केलेल्या 2021मधील ‘बेस्ट कंपनीज फॉर वुमन इन इंडिया’ या अहवालानुसार, 2016 ते 2021 मध्ये महिलांचा सहभाग 10 टक्क्यांनी वाढला आहे. 2016मध्ये महिला कर्मचाऱ्यांचं प्रमाण 25 टक्के होतं. 2021 मध्ये ते 34.5 टक्के झालं आहे. कर्मचार्यांमध्ये महिलांचा सहभाग जवळपास 10 टक्के वाढला आहे. 2020 ते 2021 या कालावधीत एकूण महिला कर्मचार्यांचं प्रमाण 4.34 टक्के वाढलं आहे. आयटी आणि आयटीईएस (IT/ITeS) क्षेत्रात, महिलांचं प्रतिनिधित्व 2021 मध्ये 2020 मधल्या 31 टक्क्यांवरून 32.3 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. व्यवस्थापकीय स्तरावर महिलांचं प्रमाण 2020 मध्ये 19 टक्क्यांवरून 2021 मध्ये 21 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. अवतार ग्रुपच्या संस्थापक-अध्यक्ष सौंदर्या राजेश म्हणाल्या, ‘आता औपचारिकरीत्या रिमोट वर्कची ऑफर देणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढेल, त्यामुळे महिलांसाठी अशा नोकऱ्या वाढतील. शहरी भागातल्या सुमारे 12 लाख महिलांना कामाच्या या नवीन मॉडेलचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.’ कोरोना साथीचा काळ आणि नोकरी सोडण्याचं प्रमाण यामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागावर विपरीत परिणाम झाला असला, तरी आता भारतीय कंपन्यांमध्ये विविध प्रकारची कामं करू शकणाऱ्या व्यक्तींची मागणी वाढत आहे. ‘कंपन्या आता महानगरं आणि टिअर 1 शहरांपुरत्या मर्यादित न राहिल्यानं रिमोट वर्किंगला चांगलीच चालना मिळाली आहे. कंपन्या आता गुलबर्गा, हिस्सार, विजयवाडा यांसारख्या छोट्या शहरांमधून कर्मचारी घेण्याचा विचार करत असल्याचं दिसत आहे,’ असंही सौंदर्या राजेश यांनी सांगितलं. आयटी कंपन्यांनी उचललेल्या या पावलामुळे अधिकाधिक महिलांना संधी मिळत आहे. JOB ALERT: पुणे जिल्हा शिक्षण मंडळात ‘या’ पदांसाठी पदभरतीची घोषणा; असं करा Apply ऋतुपर्णा चक्रवर्ती यांच्या मते, ‘अनेक दशकांपासून अनेक कंपन्या कामाच्या ठिकाणी महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत त्यामुळे हळूहळू हा बदल होत आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे विविधता, समानता आणि समावेशन धोरण.’ या बाबतीत विप्रोचं (Wipro) उदाहरण घेतल्यास हे लक्षात येईल. या कंपनीच्या मनुष्यबळ विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य संस्कृती अधिकारी सुनीता चेरियन यांच्या मते, ‘गेल्या 18 महिन्यांत नेतृत्वाच्या बाबतीत जेंडर डायव्हर्सिटी जवळजवळ दुप्पट झाली आहे. कंपनीच्या एकूण कर्मचार्यांमध्ये 36 टक्क्यांहून अधिक महिला कर्मचारी आहेत.’ ‘ही विविधता आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. महिलांच्या करिअरच्या विकासासाठी आणि जेंडर इक्विटी सुनिश्चित करण्यासाठी योग्य परिस्थिती, पद्धत निर्माण करण्यावर आमचा विश्वास आहे. दर वर्षी आमच्याकडे जेंडर डायव्हर्सिटी वाढत आहे. आम्ही या वर्षी एंट्री लेव्हलवर सुमारे 30,000 ऑफर्स देण्याची योजना आखत आहोत. त्यापैकी 50 टक्के महिला असतील,’ असंही चेरियन यांनी सांगितलं. याशिवाय, कंपनीने फ्लेक्झिबल कामकाजाचे पर्यायही दिले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या दिवसाचं नियोजन स्वत:च्या इच्छेनुसार करता येतं. यामुळेदेखील मोठी मदत झाली आहे. कंपनीच्या अंतर्गत सर्वेक्षणातून असं दिसून आलं आहे, की यामुळे 77 टक्के महिला कर्मचाऱ्यांना मोठी मदत झाली आहे. घरातून काम करण्याच्या सुविधेमुळे अधिक महिलांना पुन्हा नोकरी करण्यास मदत झाली आहे का? आणि या समस्येचं निराकरण करण्यासाठी कंपन्या कोणती पावलं उचलत आहेत, या मनीकंट्रोलने विचारलेल्या प्रश्नाला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांनी प्रतिसाद दिला नाही. आता कोरोना साथीचे सावट ओसरलं असल्यानं कंपन्या कर्मचार्यांना ऑफिसमध्ये परत आणू पाहत आहेत. अशा परिस्थितीत रिमोट वर्क सुरू ठेवता येईल की नाही हे सांगणं कठीण आहे. तज्ज्ञांच्या मते, ऑफिसमधून काम करण्यापेक्षा रिमोट वर्क संस्कृतीचा स्वीकार आणि हायब्रिड वर्कप्लेस मॉडेल महिलांना अधिक मदत करणारं ठरेल. नोकरी शोधणाऱ्यांसाठी पुण्यातील स्टार्टअप ठरणार संजीवनी? काय आहे संकल्पना? याबाबत ‘अवतार’चे राजेश म्हणाले, ’ शारीरिक, मानसिक, मानसिक अशा सर्वच स्तरावर आव्हानांना तोंड द्यावं लागत होतं अशा काळात अनेक महिलांनी कामाव्यतिरिक्त अन्य बाबतीतली चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी स्वेच्छेने करिअरमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं आम्ही पाहिलं आहे; पण आता शाळा आणि इतर सेवासुविधांचे पर्याय खुले झाले आहेत. तसंच कंपन्या आता पुन्हा करिअर करू इच्छिणाऱ्या महिलाच नव्हे तर पहिल्यांदाच नोकरी करू इच्छिणाऱ्या गृहिणींनाही नोकरी देण्याबाबत पुढाकार घेत आहेत. यामुळे आगामी काळ महिलांसाठी आशादायी असेल असं ठामपणे वाटतं.’ ऋतुपर्णा चक्रवर्ती म्हणाल्या, की ‘कार्यालयात परत येणं हे महिला कर्मचाऱ्यांसाठी एक स्वागतार्ह पाऊल आहे. कारण यामुळे ऑफिसचं काम आणि घरातलं काम किंवा जबाबदारी यातली सीमारेषा ठळक करणं शक्य होत आहे. आता अनेक महिला घरातून काम करण्याच्या रुटीनमधून मुक्त होऊ पाहत आहेत. ऑफिसला परत जाण्यासाठी उत्सुक आहेत. हायब्रिड वर्क मॉडेलही कर्मचारी आणि कंपनी दोघांसाठीही फायद्याचं आहे. कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये परत यावं यासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या कंपन्या मानसिक आरोग्यावर, सर्वसमावेशक आणि फ्लेक्झिबल वर्कप्लेस विकसित करण्यावर भर देत आहेत. याचा नक्कीच चांगला प्रभाव पडेल.’