JOIN US
मराठी बातम्या / करिअर / NIRF Rankings: देशातील टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ नाही; नक्की कारण काय?

NIRF Rankings: देशातील टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ नाही; नक्की कारण काय?

देशातील टॉप-10 विद्यापीठांची तसंच इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट आणि मेडिकल क्षेत्रातील टॉप-10 कॉलेजेसची लिस्ट देण्यात आली आहे. मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही.

जाहिरात

महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ नाही

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06, जून: केंद्रीय शिक्षण मंत्रालय दरवर्षी देशातील सर्वोच्च युनिव्हर्सिटीज, निरनिराळ्या क्षेत्रातील टॉप कॉलेजेस यांची यादी जाहीर करतं. यामुळे मुलांना चांगल्या विद्यापीठात आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेता येतं. यंदाही म्हणजे 2023 साठी NIRF रँकिंग जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये देशातील टॉप-10 विद्यापीठांची तसंच इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट आणि मेडिकल क्षेत्रातील टॉप-10 कॉलेजेसची लिस्ट देण्यात आली आहे. मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. पण कसा का? नक्की महाराष्ट्रातील शिक्षण संस्था आणि विद्यापीठं कुठे कमी पडताहेत? बघूया. या वर्षी IIT मद्रासने एकूण क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत, AIIMS, दिल्ली पहिल्या स्थानावर आहे, PGIMER, चंदीगड दुसऱ्या स्थानावर आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये शीर्ष विद्यापीठे, सर्वोच्च महाविद्यालये आणि सर्वोत्तम अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा आणि व्यवस्थापन आणि फार्मा महाविद्यालयांसह उप-श्रेणींमध्ये उच्च शिक्षण संस्थांची क्रमवारी समाविष्ट आहे. … अन् सीमेवर दिसू लागली अदृश्य सावली; सैन्याचा ‘तो’ वीर जवान जो मृत्यूनंतरही करतोय देशाचं रक्षण महाराष्ट्रात अशी अनेक विद्यापीठं आहेत ज्यांचा शैक्षणिक दर्जा फार मोठा आहे. अनेक विद्यार्थी या संस्थांमधून उच्च श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत. तसंच प्लेसमेंट्सच्या बाबतीतही या विद्यापीठांचा क्रमांक चांगला आहे. मात्र NIRF च्या रँकिंगमध्ये ही विद्यापीठं नाहीत. इतकंच नाही तर मुंबई विद्यापीठ हे पहिल्या पन्नास विद्यापीठांच्या यादीतही नाही. त्यामुळे शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. NIRF Ranking 2023: मुलांना चांगलं शिक्षण द्यायचंय ना? मग NIRF रँकिंगनुसार ‘या’ आहेत देशातील टॉप-10 युनिव्हर्सिटीज असं ठरवलं जातं NIRF रँकिंग देशातील विद्यापीठाचं NIRF रँकिंग हे त्या विद्यापीठातील शिक्षण, शिकवण्याची पद्धत आणि त्या विद्यापीठातील संसाधनं यावर ठरवण्यात येतं. तसंच त्या विद्यापीठात संशोधन आणि प्रोफेशनल प्रॅक्टिस करवण्यात येतात का आणि त्यांचं प्रमाण काय? यावरही हे रँकिंग ठरवण्यात येतं. या विद्यापीठाची पोहोच आणि समावेशकता यावरही हे रँकिंग ठरवण्यात येतं. तसंच या विद्यापीठातून पदवीधर झालेल्या उमेदवारांना पदवीनंतर काय लाभ मिळतात यावरही रँकिंग ठरवण्यात येतं. UPSC Exam Tips: IAS, IPS व्हायचंय ना? मग UPSC परीक्षेत ‘या’ चुका कधीच करू नका; हातचा जाईल जॉब NIRF रँकिंग नुसार टॉप-10 युनिव्हर्सिटीज

कॉलेजचं नाव कॉलेजचं नाव 
आयआयएससी बंगलोरमणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU)अमृता विश्व विद्यापीठम्
जामिया मिलिया इस्लामियावेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
जाधवपूर विद्यापीठअलीगढ मुस्लिम विद्यापीठ
बनारस हिंदू विद्यापीठहैदराबाद विद्यापीठ

IBPS RRB Recruitment 2023: आली सरकारी नोकरी; 1-2 नव्हे तब्बल 8594 जागांसाठी मेगाभरती; ही घ्या अर्जाची लिंक पण या सर्व गोष्टींमध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठं कमी पडत आहेत असं NIRF रँकिंगवरून तरी स्पष्ट होतंय. महाराष्ट्रातील विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा हा नक्कीच चांगला आहे मागतर त्यात अजून सुधारणा होण्याची गरज आहे असं काही एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. तसंच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणि विद्यापीठांना एकमेकांशी समतोल साधून योग्य ती शिक्षण पद्धती अवलंबवावी लागेल असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या