NIRF नुसार टॉप-10 विद्यापीठ
मुंबई, 05, जून: आपल्या मुलांना देशातील सर्वात चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळावा म्हणून अनेक पालक नेहमीच प्रयत्न करत असतात. मात्र या टॉप युनिव्हर्सिटी कोणत्या आहेत हे अनेकांना माहितीच नसतं. म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्रालय दरवर्षी देशातील सर्वोच्च युनिव्हर्सिटीजची यादी जाहीर करतं. यामुळे मुलांना चांगल्या विद्यापीठात शिक्षण घेता येतं. यंदाही म्हणजे 2023 साठी NIRF रँकिंग जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये देशातील टॉप-10 विद्यापीठांची लिस्ट देण्यात आली आहे. चला तर बघूया, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केले जाणारे NIRF रँकिंग 2023 जाहीर केलं आहे. ज्यामध्ये देशातील सर्वोच्च संस्थांना विविध श्रेणींमध्ये मानांकन देण्यात आलं आहे. जिथे एकूण क्रमवारीत IIT मद्रास ही देशातील सर्वोत्तम संस्था आहे. त्याच वेळी, IISc बेंगळुरूला विद्यापीठांच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा दर्जा मिळाला आहे. चला जाणून घेऊया, कोणती टॉप-10 विद्यापीठे आहेत. UPSC Exam Tips: IAS, IPS व्हायचंय ना? मग UPSC परीक्षेत ‘या’ चुका कधीच करू नका; हातचा जाईल जॉब NIRF नुसार टॉप-10 विद्यापीठ NIRF रँकिंग 2023 नुसार, देशातील सर्वोच्च विद्यापीठ म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर. दुसरीकडे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर जामिया मिलिया इस्लामिया आणि जादवपूर विद्यापीठ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. तर बनारस हिंदू विद्यापीठ पाचव्या क्रमांकावर आहे. मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशनला 6 वे स्थान देण्यात आले आहे. सातव्या क्रमांकावर अमृता विश्व विद्यापीठ आहे. IBPS RRB Recruitment 2023: आली सरकारी नोकरी; 1-2 नव्हे तब्बल 8594 जागांसाठी मेगाभरती; ही घ्या अर्जाची लिंक NIRF रँकिंगमध्ये वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला 8 वे आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठ 9व्या स्थानावर आहे. आणि पहिल्या 10 यादीत 10 वा क्रमांक हैदराबाद विद्यापीठाला देण्यात आला आहे. शीर्ष 10 ची यादी खाली पहा- Success Story: IAS होण्यासाठी सोडलं मिस इंडिया होण्याचं स्वप्नं; नक्की कोण आहे ही ब्युटी क्वीन? Photos NIRF रँकिंग नुसार टॉप-10 युनिव्हर्सिटीज आयआयएससी बंगलोर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) जामिया मिलिया इस्लामिया जाधवपूर विद्यापीठ बनारस हिंदू विद्यापीठ मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अमृता विश्व विद्यापीठम् वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अलीगढ मुस्लिम विद्यापीठ हैदराबाद विद्यापीठ