NEET UG 2023
मुंबई, 05 मार्च : NEET UG ची परीक्षा यंदा देऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आजपासून म्हणजेच 5 मार्चपासून नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET UG 2023) साठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अर्ज प्रक्रिया (NEET UG 2023 नोंदणी) सुरू झाल्यानंतर, उमेदवार NTA च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. NEET UG 2023 ची प्रवेश परीक्षा 7 मे 2023 रोजी होणार आहे. सरकारी अधिकारी होण्याची सर्वात मोठी संधी; MPSC तर्फे तब्बल 673 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय याशिवाय उमेदवार https://neet.nta.nic.in/ या लिंकवर क्लिक करून थेट अर्ज करू शकतील. NEET UG 2023 साठी नोंदणी करण्यापूर्वी एक माहिती बुलेटिन जारी केले जाईल. यापूर्वी, नोंदणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यादरम्यान होणार होती, परंतु NTAच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते की फेब्रुवारीच्या अखेरीस अर्ज प्रक्रिया सुरू होईल. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, 24 फेब्रुवारी रोजी एका अधिकाऱ्याने सांगितले होते की नोंदणी बहुधा ‘मार्चच्या पहिल्या आठवड्यात’ सुरू होईल. Agniveer Bharti: अवघ्या 7 मिनिटांमध्ये धावावं लागेल 1.6 किमी; असे असतील महिला अग्निवीरांसाठी निकष एकदा नोंदणी सुरू झाल्यानंतर उमेदवारांना प्रथम NTA च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि नंतर सर्व आवश्यक वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील प्रविष्ट करावे लागतील. त्यानंतर, उमेदवारांना विचारलेली कागदपत्रे आणि स्कॅन केलेल्या प्रतिमा अपलोड कराव्या लागतील, अर्ज शुल्क भरावे लागेल आणि नंतर फॉर्म सबमिट करावा लागेल. उमेदवारांना भविष्यातील संदर्भासाठी अर्ज डाउनलोड करण्याचा सल्ला दिला जातो.