मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Agniveer Bharti: अवघ्या 7 मिनिटांमध्ये धावावं लागेल 1.6 किमी; असे असतील महिला अग्निवीरांसाठी निकष

Agniveer Bharti: अवघ्या 7 मिनिटांमध्ये धावावं लागेल 1.6 किमी; असे असतील महिला अग्निवीरांसाठी निकष

महिला अग्निवीरांसाठी निकष

महिला अग्निवीरांसाठी निकष

भारतीय लष्कराच्या भरती वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन नोंदणी करा. पण त्या आधी यासाठी एलिजिबिलिटी काय आहे आणि निकष काय आहेत. जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 मार्च: भारतीय लष्करात अग्निपथ योजनेअंतर्गत केवळ मुलेच नाही तर मुलीही अग्निवीर बनू शकतात. भारतीय सैन्याने महिला अग्निवीर भरती 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. महिला अग्निवीर भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया देखील 1 मार्चपासून सुरू झाली आहे. भारतीय लष्कराचा ऑलिव्ह ग्रीन युनिफॉर्म परिधान करून अग्निवीर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी ही एक उत्तम संधी आहे. तुम्हालाही भरती व्हायचे असेल, तर शेवटच्या तारखेची वाट पाहण्याऐवजी, आजच भारतीय लष्कराच्या भरती वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन नोंदणी करा. पण त्या आधी यासाठी एलिजिबिलिटी काय आहे आणि निकष काय आहेत. जाणून घेऊया.

पुरुषांप्रमाणेच महिला अग्निवीरांचीही चार वर्षांसाठी भरती करण्यात येणार आहे. अग्निवीर जनरल ड्यूटी (GD), तांत्रिक (एव्हिएशन / अॅम्युनिशन एक्झामिनर), लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेडसमन 10वी पास आणि 8वी पास या पदांसाठी महिलांची सैन्यात भरती केली जाऊ शकते. भारतीय सैन्यात महिला अग्निवीर भरतीसाठी नोंदणीची अंतिम तारीख 17 एप्रिल 2023 आहे.

IAF Agniveer Bharti: वायुसेनेत लवकरच सुरु होणार अग्निवीरांची भरती; तुम्ही आहात का एलिजिबल? बघा

महिला अग्निवीर होण्यासाठी वयोमर्यादा

महिला अग्निवीर होण्यासाठी वय किमान17.5 वर्षे आणि कमाल 21 वर्षे असावे.

संरक्षण कर्मचार्‍यांसाठी वयोमर्यादा 30 वर्षे आहे.

ही शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक

किमान 45% गुणांसह महिला अग्निवीर जनरल ड्युटी (लष्करी पोलीस) साठी

10वी पास असणे आवश्यक आहे. यासोबतच, जर तुमच्याकडे हलक्या मोटार वाहनासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असेल, तर तुम्हाला ड्रायव्हर पदासाठी प्राधान्य मिळेल.

तुमच्या मुलांनी परीक्षेत नेहमी टॉप करावं असं वाटतं ना? मग पालकांनो 'या' चुका कधीच करू नका

महिला अग्निवीर भरतीसाठी शारीरिक निकष

लांबी - 162 सेमी. भारतीय गोरखा उमेदवारांना 4 सें.मी.ची सूट मिळेल.

वजन- सैन्याच्या वैद्यकीय मानकांनुसार

छाती- छातीचा विस्तार किमान पाच सें.मी.

महिला अग्निवीर भरतीसाठी शारीरिक तंदुरुस्ती

7 मिनिटे 30 सेकंदात 1.6 किमी धावावे लागेल.

10 फूट लांब उडी आणि 3 फूट उंच उडी मारावी लागेल. हे पात्रता असेल.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Indian army, Jobs Exams