JOIN US
मराठी बातम्या / करिअर / NEET PG Counselling: निकाल तर लागला पण नक्की कधीपासून सुरु होईल काउन्सिलिंग? समोर आली मोठी अपडेट

NEET PG Counselling: निकाल तर लागला पण नक्की कधीपासून सुरु होईल काउन्सिलिंग? समोर आली मोठी अपडेट

काउन्सिलिंगमध्ये सामील होण्यासाठी उमेदवाराला वैद्यकीय समुपदेशन समितीच्या (MCC) अधिकृत वेबसाइटवर mcc.nic.in वर नोंदणी करावी लागणार आहे.

जाहिरात

काउन्सिलिंग समोर आली मोठी अपडेट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 मार्च: NEET PG 2023 परीक्षेचा (NEET PG निकाल 2023) निकाल जाहीर झाला आहे. मात्र आता यशस्वी उमेदवार काउन्सिलिंगच्या तारखेची वाट पाहत आहेत. काउन्सिलिंगमध्ये सामील होण्यासाठी उमेदवाराला वैद्यकीय समुपदेशन समितीच्या (MCC) अधिकृत वेबसाइटवर mcc.nic.in वर नोंदणी करावी लागणार आहे. मात्र काउन्सिलिंग नक्की कधी सुरु होणार आहे? आणि त्यासाठी निकष काय असतील हे आधी जाणून घेऊया. मेडिकल इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2023 आहे, त्यानंतरच काउन्सिलिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे काउन्सिलिंग प्रक्रिया ऑगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबर 2023 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तुम्हालाही परदेशात जॉब हवाय ना? ‘या’ महिलेनं आतापर्यंत 3000 लोकांना दिलीये नोकरी; तुम्हीही साधा संपर्क चार टप्प्यात होणार काउन्सिलिंग समुपदेशनाची प्रक्रिया एकूण 4 टप्प्यात पूर्ण केली जाईल. NEET PG 2023 समुपदेशनाच्या आधारे, 26,168 डॉक्टर ऑफ मेडिसिन (MD), 13,649 मास्टर ऑफ सर्जरी (MS), 922 PG डिप्लोमा आणि 1,338 DNB CET जागा भरल्या जातील. NEET PG समुपदेशन 2023 मध्ये एकूण 6,102 महाविद्यालये आणि 649 रुग्णालये सहभागी होतील. ना कोणती परीक्षा ना टेस्ट, भारत सरकारच्या या विभागामध्ये थेट मिळेल नोकरी; ही पात्रता असणं आवश्यक NEET PG 2023 ची परीक्षा 5 मार्च 2023 रोजी घेण्यात आली. परीक्षा NBEMS द्वारे 277 शहरांमधील 902 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. 2,08,898 उमेदवार परीक्षेला बसले होते. परीक्षा संगणक आधारित पद्धतीने घेण्यात आली. सामान्य श्रेणी आणि EWS साठी कट ऑफ स्कोअर 800 पैकी 291 आहे, तर सामान्य श्रेणी-PwBD साठी 274 आणि SC/ST/OBC साठी 257 आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली सूचना पाहू शकतात.

त्याच वेळी, FAIMA ने NEET PG 2023 परीक्षा दोन ते तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शनेही केली होती. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावत परीक्षा वेळेवर घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता निकाल जाहीर होऊन पुढील प्रक्रिया सुरु होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या