JOIN US
मराठी बातम्या / करिअर / पुणे : अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! MPSC चा मोठा निर्णय

पुणे : अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! MPSC चा मोठा निर्णय

एमपीएससीने मोठा निर्णय घेतला आहे.

जाहिरात

फाईल फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 23 फेब्रुवारी : गेल्या काही महिन्यांपासून मुंबई MPSC चे नवीन नियम 2025 पासून लागू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी अनेकदा आंदोलनही करण्यात आले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षांच्या मुख्य परीक्षांसाठी वर्णात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यूपीएससीच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, विद्यार्थ्यांनी आंदोलन करत हा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याची मागणी केली होती. याबाबत आता राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. एमपीएससीचा निर्णय काय - राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा आणि सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत आहे, असे एमपीएससीने म्हटले आहे.

Eknath Shinde MPSC Student : ‘चुकून बोलून गेलो’; त्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागितली जाहीर माफी मुख्यमंत्र्यानीही घेतली होती दखल - एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मी स्वतः बोललो. जी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली, तिच भूमिका सरकारची देखील आहे. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या दोन पद्धतीबाबत काही सूचना आल्या आहेत. 2025 पासून जी नवी पद्धत सुरु करण्यात येणार होती, त्याबाबत आम्ही आयोगाला पत्र दिले असून त्यांना कळवले आहे. आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेबाबत सरकार सहमत असून आयोगाने देखील तशाच प्रकारचा निर्णय घ्यावा, अशी आमची अपेक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या