JOIN US
मराठी बातम्या / करिअर / MPSC ची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षांच्या पद्धतीमध्ये होणार मोठे बदल

MPSC ची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षांच्या पद्धतीमध्ये होणार मोठे बदल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पध्दतीमध्ये सुधारणा (MPSC changed Exam Process of prelims & Mains Exams) करण्याचा निर्णय आयोगातर्फे घेण्यात आला आहे.

जाहिरात

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 ऑगस्ट: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षा विविध पदांसाठी स्वतंत्र घेण्यात येत होत्या. मात्र आता MPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पध्दतीमध्ये सुधारणा (MPSC changed Exam Process of prelims & Mains Exams) करण्याचा निर्णय आयोगातर्फे घेण्यात आला आहे. त्यानुसार आता काही महत्त्वाचे बदल हे परीक्षेच्या पद्धतींमध्ये करण्यात आले आहेत. स्पर्धा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ आणि गट-ब संवर्गाकरीता यापुढे पारंपारिक/वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तसंच राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट-अ आणि गट-ब संवर्गातील पदभरतीसाठी ‘एकच प्रिलिम्स परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजेच दोन्ही पाडभरतींसाठी एकच प्रिलिम्स असणार आहे. मात्र मेन्स परीक्षा स्वतंत्र पद्धतीनं घेतल्या जाणार आहेत. ग्रॅज्युएट होऊन बरेच दिवस नोकरी मिळत नाही? चिंता करूच नका; जॉब शोधण्याआधी हे करा

उमेदवारांकडून अर्ज स्वीकारताना सर्व जाहिरात केलेल्या संवर्गासाठी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा गुणवत्तेच्या आधारे कॅडरचा पर्याय घेतला जाईल. तसेच संबंधित संवर्गासाठी उमेदवाराने दिलेला पर्याय हा संबंधित संवर्गातील पदासाठीचे अर्ज मानले जातील आणि त्यानुसार ते भरले जातील. पदांच्या संख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांची संख्या निश्चित करून संवर्गासाठी पूर्वपरीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर केला जाईल.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्‍त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता संबंधित संवर्गासाठी निश्‍चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येईल. मोठी बातमी! MPSC ग्रुप C Mains परीक्षेचं हॉल तिकीट जारी; अशा पद्धतीनं लगेच करा डाउनलोड महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा’ या मुख्य परीक्षांच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता संबंधित संवर्गासाठी निश्‍चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येतील. हे महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. एकूणच काय तर आता MPSC च्या फक्त दोनच पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र या पूर्व परीक्षांच्या आधारावर निरनिराळ्या विभागांमध्ये आपल्या करू इच्छिणाऱ्या आणि प्रवेश परिलश उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहेत. राजपत्रित गट अ आणि ब च्या सर्व मुख्य परीक्षा या लेखी असणार आहेत. तर अराजपत्रित गट ब आणि क च्या सर्व मुख्य परीक्षा या MCQ मध्ये असणार आहेत. तुम्हाला ड्रायव्हिंग येतं का? मग इथे मिळतेय 63,000 रुपये पगाराची नोकरी; करा अर्ज निर्णयामागचं कारण काय महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गाकरीता राबविण्यात येणाऱ्या विद्यमान भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेबर येणारा ताण, भरतीप्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन करावयाच्या विविध उपाययोजना, भविष्यामधील भरतीप्रक्रियेचे नियोजन या व इतर अनुषंगिक बाबींचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे असं MPSC नं स्पष्ट केलं आहे. सदर बदल 2023 मधील परीक्षांपासून लागु होतील अशीही माहिती MPSC नं दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या