मुंबई, 01 ऑगस्ट: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र ग्रुप सी सेवा एकत्रित मुख्य परीक्षा 2021 चे हॉल तिकीट जारी केले आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वरून हॉल तिकीट (MPSC Group C Mains exam hall tickets) डाउनलोड करू शकतात. MPSC गट क मुख्य परीक्षा 2021 पेपर-1 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. गट क पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि निकाल गुणवत्ता यादीत समाविष्ट केलेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. प्रिलिमचा निकाल जूनमध्ये जाहीर करण्यात आला आहे. सरकारी नोकरीच्या परीक्षांची तयारी करताय? टेन्शन घेऊ नका; या टिप्स फॉलो कराच
हॉल तिकीट 2022 डाउनलोड करण्यासाठी स्टेप
mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. ‘प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करा’ वर क्लिक करा. परीक्षा निवडा आणि OTP प्राप्त करण्यासाठी मोबाइल नंबर/ईमेल आयडी प्रविष्ट करा. OTP एंटर करा आणि Verify बटणावर क्लिक करा. -MPSC ग्रुप C चे मुख्य हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट घ्या. बारावीनंतर महिलांना नर्सिंग क्षेत्रात मोठा स्कोप; डिप्लोमानंतर इतका मिळतो पगार
या पदांसाठी होणार भरती
सेकंडरी इंस्पेक्टर इंडस्ट्री इंस्पेक्टर टैक्स असिस्टेंट क्लर्क - टाइपिस्ट (इंग्लिश) क्लर्क - टाइपिस्ट (मराठी)