JOIN US
मराठी बातम्या / करिअर / ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीचा गोल्डन चान्स; 'या' मंत्रालयात भरतीची प्रक्रिया सुरु; असा करा अर्ज

ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीचा गोल्डन चान्स; 'या' मंत्रालयात भरतीची प्रक्रिया सुरु; असा करा अर्ज

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने 31 मे 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 मे:   तुम्ही जर उच्चशिक्षित असाल आणि तुम्हाला कम्प्युटरविषयी ज्ञान असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात प्रोग्रॅम ऑफिसर आणि अकाउंटंट या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही पदं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरली जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने 31 मे 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे. या पदांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया. `स्टडी कॅफे डॉट इन`ने या विषयीची माहिती दिली आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात प्रोग्रॅम ऑफिसर आणि अकाउंटंट या दोन रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या संदर्भात मंत्रालयाकडून अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. या पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार असून, त्यासाठी अंतिम मुदत 31 मे 2023 पर्यंत आहे. तसेच उमेदवारांनी अर्जाची एक सिंगल पीडीएफ डॉक्युमेंट कॉपी nfdepwd@gmail.com या ईमेलवर देखील पाठवायची आहे. महिन्याला तब्बल 2,15,900 रुपये सॅलरी; टेलिकम्युनिकेशन्स विभागात होणार प्रतिनियुक्तीवर भरती; करा अप्लाय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, प्रोग्रॅम ऑफिसर या पदासाठी इच्छुक उमेदवाराने सामाजिक कार्य, समाजशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली असावी किंवा मान्यप्राप्त विद्यापीठ अथवा संस्थेतून विशेष शिक्षण विषयात एमएड पदवी मिळवलेली असावी. उमेदवाराला एमएस वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंटचं ज्ञान असावं. या पदासाठी प्रशासन आणि वित्त विभागातील निवृत्त शासकीय कर्मचारीदेखील अर्ज करू शकतात. अकाउंटंट या पदासाठी इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कॉमर्स किंवा समकक्ष विषयात पदवी मिळवलेली असावी. उमेदवाराला टॅली, एमएस वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट या सॉफ्टवेअरचं सखोल ज्ञान असावं. या पदासाठी प्रशासन आणि वित्त विभागातील निवृत्त शासकीय कर्मचारी देखील अर्ज करू शकतात. या दोन्ही पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान 10 वर्षांचा अनुभव असावा. तसंच इच्छुक उमेदवारांचे वय 45 ते 62 वर्षांदरम्यान असावं. या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 45,000 ते 60,000 रुपये वेतन मिळेल. ही दोन्ही पदं एक वर्षाकरिता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरली जाणार आहेत. मात्र, समितीच्या गरजेनुसार कॉन्ट्रॅक्टचा कालावधी वाढू शकतो. 10वी, 12वीनंतर टॉपला न्यायचंय करिअर? मग निकालाची वाट बघू नका; आताच सुरु करा ‘हे’ कोर्सेस सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या नोटिफिकेशननुसार, प्रोग्रॅम ऑफिसर आणि अकाउंटंट या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे. या पदांकरिता 10 मे 2023 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. हे अर्ज सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी या अर्जाचे एक सिंगल पीडीएफ डॉक्युमेंट ईमेलवर देखील पाठवावे. तसेच उमेदवाराने अर्जात त्याचा ईमेल आयडी अवश्य नमूद करावा. कारण संबंधित विभागात उमेदवाराशी त्याने दिलेल्या ईमेल आयडी वरून संपर्क साधणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज अवर सचिव (धोरण), डिपार्टमेंट ऑफ इम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसएबिलिटी (दिव्यांग), रुम नंबर 520, पाचवा मजला, बी-II विंग, दीनदयाळ अंत्योदय भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली - 110003 या पत्त्यावर 31 मे 2023 पूर्वी पाठवावेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या