पर्यावरण मंत्रालय देतंय नोकरी; करा अप्लाय
मुंबई, 26 जून : पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयात भरती प्रक्रिया सुरू आहे. मंत्रालयाने फिजिकल सायन्स व इकॉनॉमिक्स, फायनान्स कन्सल्टंट पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. मंत्रालयाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, दोन रिक्त जागा भरल्या जाणार असून, त्यासाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान 10 ते 15 वर्षांचा कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. या संदर्भात ‘स्टडी कॅफे’ने वृत्त दिलंय. पदाचे नाव व रिक्त जागा फिजिकल सायन्स व इकॉनॉमिक्स, फायनान्स कन्सल्टंट पदासाठी दोन रिक्त जागा भरल्या जातील. पगार निवडलेल्या उमेदवाराला महिन्याला एक लाख रुपये पगार मिळेल. Money Earning Tips: तोच 9-5 जॉब करुन कंटाळा आलाय ना? मग इथे मिळेल तासाला लाखो रुपये कमावण्याची ट्रिक वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे आहे. पात्रता कन्सल्टंट इकॉनॉमिक्स, फायनान्स उमेदवारांनी इन्व्हायरमेंटल अँड इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्स, एमबीए फायनान्स, फायनॅन्शिअल इश्युज या विषयांमध्ये स्पेशलायझेशनसह एमकॉम पूर्ण केलेलं असावं. उमेदवारांनी वरील विषयांत पीएच.डी. किंवा एम.फिल. केले असल्यास उत्तम. IIT New Course: देशातील या IIT कॉलेजेसनी लाँच केले ‘हे’ टॉप नवीन कोर्सेस; JEE च्या आधारे मिळेल प्रवेश कन्सल्टंट फिजिकल सायन्स उमेदवारांनी सायन्समध्ये (इन्व्हायरमेंटल, फिजिकल, केमिकल, सिव्हिल) मास्टर्स डिग्री घेतलेली असावी. उमेदवारांनी वरील विषयांत पीएच.डी. किंवा एम.फिल. केले असल्यास उत्तम. अनुभव उमेदवारांना पर्यावरण, फॉरेस्ट्री, नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट व क्लायमेंट चेंज इत्यादी क्षेत्रांत रिसर्च अँड डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, पॉलिसी अँड प्लॅनिंग इन इंडस्ट्रिअल, अकॅडेमिक, सरकारी इन्स्टिट्युशन्स, ऑर्गनायझेशनमध्ये 10 ते 15 वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव असावा. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करताय? मग राज्य सरकार करणार तुमचा पूर्ण खर्च; कसा? इथे मिळेल माहिती कार्यकाळ उमेदवारांची नियुक्ती 1 वर्षाच्या कालावधीसाठी कराराच्या आधारावर केली जाईल. कामगिरीनुसार आणि कंपनीच्या आवश्यकतांनुसार ती 3 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. अर्ज कसा करायचा इच्छुक उमेदवार पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेला अर्ज भरून ऑफलाइन अर्ज करू शकतात. तो अर्ज त्यांना “Additional Director/ Scientist E, Government of India, Ministry of Environment, Forest and Climate Change, Climate Change Division, 3rd Level, P- 328, Prithvi Wing, Jorbagh Road, New Delhi- 110003“ या पत्त्यावर पाठवावा लागेल. या शिवाय अर्ज shard.sapra@nic.in या मेल आयडीवर सबमिट करणंही आवश्यक आहे. अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत उमेदवारांना अर्ज सादर करावे लागतील. अर्जाची हार्ड कॉपी पाठवणं अनिवार्य आहे.