जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करताय? मग राज्य सरकार करणार तुमचा पूर्ण खर्च; कसा? इथे मिळेल माहिती

परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करताय? मग राज्य सरकार करणार तुमचा पूर्ण खर्च; कसा? इथे मिळेल माहिती

राज्य सरकार करणार तुमचा पूर्ण खर्च

राज्य सरकार करणार तुमचा पूर्ण खर्च

Rajarshi Shahu Maharaj Scholarship: नक्की कोणती आहे स्कॉलरशिप? कोणते उमेदवार यासाठी पात्र आहेत? आणि यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 जून : आपल्यापैकी अनेक जणांचं परदेशात शिक्षणासाठी जाण्याचं स्वप्न असतं. मात्र अनेकदा पैसे नसल्यामुळे हे स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाही. पण आता तुच्यासाठी सर्वात मोठी खूशखबर आहे. परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न पैसे नसेल तरी पूर्ण होऊ शकणार आहे. कारण महाराष्ट्र सरकार एका स्कॉलरशिपच्या आधारे तुम्हाला परदेशात शिक्षणाचा खर्च देणार आहे. नक्की कोणती आहे स्कॉलरशिप? कोणते उमेदवार यासाठी पात्र आहेत? आणि यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर जाणून घेऊया. महाराष्ट्र सरकार पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास कोणतीही अडचण येऊ नये म्हणून अनेक शिष्यवृत्ती प्रदान करते. परदेशात अभ्यास करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ही जगातील सर्वोत्तम महाविद्यालयांमधून शिकण्याची संधी देते. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन परदेशात उच्च शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्वीकारतो. मात्र ही स्कॉलरशिप नक्की कोणाला मिळते जाणून घेऊया. Maharashtra Talathi Bharti 2023: राज्यात तलाठी 4644 जागांसाठी सर्वात मोठ्या पदभरतीची घोषणा; ही घ्या डायरेक्ट लिंक काय पात्रता असणं आवश्यक? उमेदवार हे अनुसूचित जाती किंवा नव-बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त नसावे. पीजी अभ्यासक्रमांसाठी वयोमर्यादा 35 वर्षे आहे, आणि पीएच.डी. 40 आहे आंतरराष्ट्रीय संस्थेतील त्यांच्या पहिल्या, द्वितीय किंवा तृतीय वर्षातील विद्यार्थी देखील पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात. त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी केवळ मुदतीच्या काही भागासाठी शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. विद्यार्थ्यांनी 300 किंवा त्याहून अधिक जागतिक संस्था रँक असलेल्या संस्थेत प्रवेश घेतला असावा. परदेशात पदव्युत्तर अभ्यासासाठी यापूर्वी हा पुरस्कार मिळालेले विद्यार्थी पीएच.डी.साठी पुन्हा अर्ज करू शकतात. ही स्कॉलरशिप केवळ कुटुंबातील पहिल्या दोन मुलांसाठीच उपलब्ध आहे. Western Railway Recruitment: 1-2 नाही तर तब्बल 3624 जागा अन् पात्रता फक्त 10वी; रेल्वेत मेगाभरतीची घोषणा काय आहेत या स्कॉलरशिपचे लाभ ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या ट्यूशन आणि चाचणी शुल्काच्या 100% पर्यंत संपूर्ण खर्च करते. 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले सरकारी अनुदानित आणि निमसरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणारे उमेदवार पूर्ण शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीसाठी पात्र असतील. 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उमेदवार जे अंशतः अनुदानित/विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात त्यांना 50% शिक्षण शुल्क कव्हरेज मिळेल. पात्र उमेदवारांना 5000 रुपयांचा शैक्षणिक खर्च स्टायपेंड देखील मिळेल. यात रु. 5000 चा पुस्तक आणि स्टेशनरी भत्ता दिला जातो. PMC Recruitment: तुम्हीही ग्रॅज्युएट आहात? टायपिंगही येतं? मग पुणे महापालिकेत जॉबची संधी सोडूच नका; करा अप्लाय स्कॉलरशिपसाठी असा करा अर्ज यासाठी आधी विद्यार्थ्यांना www.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे. यानंतर त्यांना रोजगार सेक्शनला जाऊन अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यायचा आहे. यांनतर अर्ज संपूर्णपणे भरून घ्यायचा आहे. भरलेला अर्ज हा ‘समाजकल्याण आयुक्तालय चर्च पाठ पुणे ४११००१’ या पत्त्यावर पाठवून द्यायचा आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी समाज कल्याण आयुक्तालयात संपर्क करायचा आहे.

News18लोकमत
News18लोकमत

कधी असेल शेवटची तारीख यंदाच्या वर्षी या स्कॉलरशिपचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आता 05 जुलै 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्हीही यास स्कॉलरशिपसाठी पात्र असला तर अर्ज नक्की करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात