काही IMP गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक
मुंबई, 07 जून: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) 18 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान इयत्ता 12वी (HSC) परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या, तर इयत्ता 10वी (SSC) परीक्षा 3 ते 23 मार्च या कालावधीत होणार होत्या. शेवटची परीक्षा 23 मार्च रोजी होती. या परीक्षेचे निकाल उशिरा लागण्याची चिन्हं होती, मात्र आता बारावीच्या निकालाची जाहीर झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे दहावी आणि बारावी स्टेट बोर्डाचे निकाल. अखेर उद्या म्हणजेच 08 जुने 2022 ला स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं आहे. निकाल जाहीर होण्यासाठी चोवीस तासांहुनही कमी वेळ उरला आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी निकालाआधी गोंधळ होऊ नये म्हणून काही IMP गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. MH BOARD 12TH RESULT: निकालाच्या भीतीनं विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा; तर पालकही चिंतेत; असं शांत ठेवा मन या IMP गोष्टी ठेवा लक्षात निकाल चेक करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचं नाव महत्वाचं असणार आहे. जर तुमच्या रोल नंबरवरून तुमचा रिझल्ट दिसत नसेल तर तुमच्या आईच्या नावाने तुम्हाला रिझल्ट बघता येणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना निकाल चेक करण्याआधी संपूर्ण क्रेडेन्शियल्स बरोबर आहेत ना याची खात्री करणं आवश्यक असणार आहे. निकाल बघताना तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन बरोबर आहे ना याचीही खात्री करून घ्या. शक्य असल्यास निकाल हा लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरच बघा. मोबाईल आणि SMS द्वारेही निकाल बघता येणार आहे. काय होता गेल्या वर्षीचा निकाल गेल्या वर्षी विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आलेला राज्याचा बारावीचा एकूण निकाल 99.63% इतका होता. तर यात बारावी विज्ञान विभागाचा निकाल 99.45% इतका होता तर बारावी वाणिज्य विभागाचा निकाल 99.91% होता. तसंच बारावी कला विभागाचा निकाल 99.83% आणि बारावी एमसीव्हीसी निकाल 98.80% इतका होता. एकूणच काय तर मागील वर्षी [परीक्षा झाल्या नसल्या तरी निकाल मात्र ऐतिहासिक पद्धतीनं अधिक होता. MH BOARD 12TH RESULT: गेल्या वर्षीच्या तुलनेत कसा असेल 12वीचा निकाल? ऑफलाईन परीक्षांचा होणार फायदा की तोटा? कुठे बघता येईल निकाल हाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल 2021 News18.com वर पाहता येईल. तुम्ही MSBSHSE च्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. 12वीचे निकाल 2020 - lokmat.news18.com वर लाइव्ह 10वी, 12वी 2021 बोर्ड रिझल्ट ऑनलाइन बघू शकता.