नवी दिल्ली: भारतातील तरुण पिढी आता नोकरी करण्यापेक्षा उद्योग-व्यवसायांकडे वळत आहे. नवउद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ज्या उच्चशिक्षित तरुणांनी आपले स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांनादेखील चांगल्या प्रकारे यश मिळताना दिसत आहे. अशा यशस्वी व्यावसायिकांमध्ये प्रफुल्ल बिलोरे यांचा समावेश होतो. प्रफुल्ल ‘एमबीए चायवाला’ या नावानं प्रसिद्ध आहेत. एक उद्योजक, मोटिव्हेशनल स्पीकर आणि आयआयएम ड्रॉप आउट असलेल्या प्रफुल्ल यांनी व्यवसायाच्या बळावर एक नवीन लक्झरी कार खरेदी केली आहे. त्यांनी मर्सिडीज-बेंझ जीएलई ही कार खरेदी केली असून आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. प्रफुल्ल यांनी खरेदी केलेली मर्सिडीज-बेंझ जीएलई कार ही एक अत्याधुनिक फीचर्स असलेली कार आहे. मर्सिडीजच्या बेस्ट सेलिंग एसयूव्हीमध्ये तिचा समावेश होतो. भारतीय बाजारपेठेत तिची किंमत 88 लाख रुपयांपासून सुरू होते. विविध व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असलेल्या या कारची कमाल किंमत 1.05 कोटी रुपयांपर्यंत आहे. ही मर्सिडीज एसयूव्ही, 300डी, 400डी आणि 450डी पेट्रोल व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे.
SBI ची ग्राहकांना मोठी भेट! आता FD वर मिळणार जास्त व्याज, चेक करा रेट्सया कारमध्ये 3 लिटर क्षमतेचं सहा-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 435 बीएचपी पॉवर जनरेट करतं. तर, डिझेल व्हेरिएंटमध्ये 2 लिटर क्षमतेचं इंजिन आहे जे 245 बीएचपी पॉवर जनरेट करतं. या शिवाय, ही एसयूव्ही 330 बीएचपी पॉवर जनरेट करण्याची क्षमता असलेल्या 3 लिटर डिझेल इंजिनसोबतही उपलब्ध आहे. हे इंजिन 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. या एसयूव्हीच्या किंमतीवरून अंदाज लावता येऊ शकतो की त्यातील फीचर्स नक्कीच अत्याधुनिक असतील. सुरक्षेच्या दृष्टीनं, यात नऊ एअरबॅग्ज, अॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटो कनेक्टिव्हिटी, पॅनोरमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, बर्मेस्टर साउंड सिस्टम, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, एअर सस्पेन्शन आणि पार्किंग असिस्टची सुविधा मिळते.
PPF मधून जास्त नफा कमावण्याची सोपी ट्रिक, होईल जास्त फायदा!प्रफुल्ल बिलोरे यांच्याबद्दल अधिक सांगायचं झाल्यास, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट संस्थेच्या (आयआयएम) अहमदाबाद कॅम्पसबाहेर चहाचा स्टॉल सुरू केला तेव्हा प्रफुल्ल पहिल्यांदा चर्चेत आले होते. त्यांनी हाच व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आज देशभरात त्यांची 200 पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत. बहुतेकांना वाटतं की ‘एमबीए चायवाला’ यातील एमबीए म्हणजे प्रफुल्लचं शिक्षण आहे. पण, प्रत्यक्षात त्याचा अर्थ वेगळा होतो. प्रफुल्लच्या फर्ममधील एमबीएचा अर्थ ‘मिस्टर बिलोरे अहमदाबाद’ असा आहे. प्रफुल्लनं आपल्या नवीन लक्झरी एसयूव्ही कारच्या डिलिव्हरीचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.