महाराष्ट्र यंग लीडर्स एस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम
मुंबई, 06 जून: महाराष्ट्र सरकारने बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठीही दोन नवीन शैक्षणिक प्रोग्रॅम आज लाँच केले आहेत. सरकारने आज शालेय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र यंग लीडर्स एस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम (MYLAP) सुरू केला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. या प्रोग्रॅमअंतर्गत राज्य सरकारनं HCL कंपनीसोबत मोठा कॉन्ट्रॅक्ट केला आहे. यामध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जॉब आणि ट्रैनिंग ऑफर करण्यात येणार आहे. तसंच शालेय विद्यार्थ्यांना व्यावसायिक स्किल्स देण्यासाठी सरकार उद्योग क्षेत्रातील दिग्गजांशी सहयोग करेल आणि विद्यार्थ्यांना सक्षम करेल असं शिक्षण मंत्र्यांनी म्हंटलं आहे. काय आहे MYLAP प्रोग्राम MYLAP म्हणजे Maharashtra Young Leaders’ Aspiration Development Program. या कार्यक्रमांतर्गत, राज्य सरकारने 2021 आणि 2022 च्या इयत्ता 12 व्या बॅचच्या 20,000 विद्यार्थ्यांसाठी लवकर करिअर प्रोग्रामसाठी HCL टेक्नॉलॉजीजशी करार केला आहे. ज्यां विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांमधून विज्ञान शाखेतून गणिताची निवड केली आहे अशा पात्र विद्यार्थ्यांना कंपनी 1.70 ते 2.20 लाखांच्या वार्षिक पगारावर नोकरी देणार आहे. MH BOARD 10TH AND 12TH RESULT: पालकांनो, मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील, चिंता करू नका; याच आठवड्यात निकाल ‘स्वजीवी’ देणार पंखांना बळ याशिवाय, सरकारने स्वाजीवी महाराष्ट्र देखील सुरू केला आहे, जो सरकारी शाळांमध्ये इयत्ता 6-9 साठी एक स्टार्टअप इकोसिस्टम सुरू करण्यासाठी उद्योजकता आणि जीवन कौशल्य शिक्षण मॉडेलसाठी EnPower सोबत करार केला आहे. 488 आदर्श शाळांमध्ये सुरू होणारा हा पथदर्शी प्रकल्प 50,000 हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे.
“मास्टर ट्रेनर आणि उद्योग तज्ञांच्या मार्गदर्शनाच्या मदतीने, आम्हाला यापैकी बरेच जण चेंजमेकर आणि भविष्यातील टायकून बनलेले पाहण्यास आवडेल. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, आम्ही आमच्या प्रतिभावान तरुण स्टार्ससाठी स्टार्ट-अप आयडिया चॅलेंज आयोजित करण्याची योजना आखत आहोत,” असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटलं आहे. कोरोना म्हणतोय ‘पुन्हा येईन’; त्यात शाळा होताहेत सुरु; विद्यार्थ्यांनो दुर्लक्ष करू नका कोरोनाचे ‘हे ’ नियम पाळाच या कार्यक्रमादरम्यान, आम्ही उद्योगातील दिग्गजांसह अशा आणखी अनेक सहकार्यांमध्ये प्रवेश करण्याची आशा करतो जेणेकरुन आमच्या तरुण प्रतिभेचा मोठा समूह त्यांनी शाळा सोडण्यापूर्वीच उद्योग तयार होईल.” असंही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.