मुंबई, 19 एप्रिल: एप्रिल महिना सुरु आहे त्यामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा (Board Exams) सुरु आहेत. तर काही राज्यांमध्ये बोर्डाच्या परीक्षा होऊन गेल्या आहेत. आता मात्र विद्यार्थी निकालाची (Board exam Results 2022) प्रतीक्षा करत आहेत. महाराष्ट्रात शिक्षण ऑनलाईन झालं मात्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थी नाराजही होते. ऑफलाईन परीक्षा (Maharashtra state Board Exam Result) रद्द करण्यात याव्यात म्हणून काही विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं. मात्र यानंतरही राज्यात बोर्डाच्या परीक्षा (State Board exam Result 2022) ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्यात. मात्र आता स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. काही मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे स्टेट बोर्डाच्या परीक्षांचा निकाल (State Board exam Result 2022 date) लवकरच जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (MSBSHSE) द्वारे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल तयार केला जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे हा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी.सूत्रांनी अशी माहिती दिली आहे. CBSE Exam एकतर रद्द करा नाहीतर….; परीक्षेला अवघे काही दिवस असताना विद्यार्थ्यांची मागणी नुकतेच महाराष्ट्र FYJC प्रवेश 2022 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, ज्याच्या आधारे निकाल मेच्या मध्यापर्यंत जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. FYJC प्रवेश 2022 च्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रवेश प्रक्रिया 17 मे पासून सुरू होणार आहे. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. अशा स्थितीत अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी या वर्गांचा निकाल जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात बोर्डाच्या परीक्षा या दरवर्षीच्या तुलनेत उशिरा घेण्यात आल्यात. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या साधारतः नेहमीपेक्षा काही दिवस उशिरा सुरु झाल्या. त्यामुळे निकाल उशीर लागणार की काय अशी शक्यता होती. मात्र हा अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक लवकर असल्यामुळे हे निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील असं दिसतंय. CBSE Exam Tips: परीक्षेत 90%हून अधिक मार्क्स हवे असतील Mock Tests देऊन बघाच दोन फेऱ्यांमध्ये होणार प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र FYJC प्रवेशासाठी तात्पुरता कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच ऑनलाइन जाहीर केले जाईल, हे नमूद करावे लागेल. महाराष्ट्र FYJC प्रवेश प्रक्रिया यावेळी दोन फेऱ्यांमध्ये होणे अपेक्षित आहे.