फक्त News18 Lokmat वर दिसेल सर्वात वेगवान निकाल
मुंबई, 24 मे: राज्यातील स्टेट बोर्डाच्या बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, उद्या 12 वीचा निकाल लागणार आहे. उद्या म्हणजे 25 मे 2023 रोजी राज्यातील 12 वीचा निकाल लागेल. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार उद्या म्हणजेच 25 मेला बारावीचा निकाल लागणार आहे. News 18 लोकमत थेट बघता येईल निकाल बारावीच्या निकालादरम्यान विद्यार्थ्यांना निकाल बघण्यास झालेली अडचण बघता बारावीच्या निकालाच्या (Result MH HSC result) दिवशी अशी अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. विशेष म्हणजे हा निकाल तुम्ही News 18 लोकमतच्या ऑफिशिअल वेबसाईटवर थेट बघू शकणार आहात. त्यामुळे निकालाच्या वेबसाईटच सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे. यासाठी तुम्हाला आधी वेबसाईटवर रजिस्टर करावं लागणार आहे. MH State Board 12th Result: विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! उद्याच जाहीर होणार 12वीचा निकाल अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन यासाठी आधी https://lokmat.news18.com/career/ या लिंकवर जा. यानंतर बोर्डाच्या निकालाची कोणतीही बातमी उघडा. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी विंडो दिसेल. इथे तुमचा क्लास म्हणजे दहावी किंवा बारावी सिलेक्ट करा. यानंतर तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भर. यानंतर Register या बटनेवर क्लिक करा. अशा पद्धतीनं नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला निकालासंदर्भात लिंक येईल. यानंतर तुम्हाला निकाल जाहीर झाल्या झाल्या लिंक ओपन करून निकाल बघता येईल. निकाल बघून तुमचा निकाल सेव्हही करता येईल.
सर्व माहिती तपासा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही. निकालानंतर ‘ही’ कागपत्रं असतील आवश्यक गुणपत्रिका (Board Marksheet) स्थलांतर प्रमाणपत्र. (Migration Certificate) उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing Certificate) कॉलेज सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) आधार कार्ड (Aadhar card) जातीचा दाखला (Caste Certificate) रहिवासी दाखला (Address Proof) पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photos)