जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / MH State Board 12th Result: विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! उद्याच जाहीर होणार 12वीचा निकाल

MH State Board 12th Result: विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! उद्याच जाहीर होणार 12वीचा निकाल

उद्याच जाहीर होणार 12वीचा निकाल

उद्याच जाहीर होणार 12वीचा निकाल

उद्या म्हणजेच 25 मे 2023 रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 मे: देशातील CBSE आणि ICSE बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. आपली मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील का? याचं टेन्शन पालकांना आलं आहे. मात्र आता स्टेट बोर्डाचा निकाल नक्की कधी लागणार याबाबत सर्वत मोठी अपडेट समोर आली आहे. उद्या म्हणजेच 25 मे 2023 रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीचा 25 मेला जाहीर होणार आहे. यंदा 13 लाखांहून अधिक विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या HSC ला बसले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळ mahresults.nic.in वर जाहीर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय,  https://lokmat.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/ या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी महाराष्ट्र HSC निकाल 2023 थेट पाहू शकतात. 12वीच्या निकालाच्या तारखांसाठी ताज्या अपडेटसाठी विद्यार्थी MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट पाहत राहतात. महाराष्ट्र SSC परीक्षा 2023 ही 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत आणि HSC परीक्षा 2023 ही 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेला लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.

या वेबसाईट्सवर चेक करू शकता निकाल www.lokmat.news18.com mahahsscboard.in mahresult.nic.in

असा चेक करा निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. होमपेजवर, बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. तुमची आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा. “निकाल पहा” बटणावर क्लिक करा. महाराष्ट्र राज्य बोर्ड 12वीचा निकाल 2023 स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील वापरासाठी Save करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात