दहावीच्या निकालात पोरी हुशार
मुंबई : बारावी पाठोपाठ आता दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result 2023) जाहीर झाला आहे. पालक आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून आज दुपारी हा निकाल ऑनलाईन वेबसाईटवर जाहीर करण्यात येत आहे. याआधी महाराष्ट्र बोर्डचे अध्यक्ष गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन दहावी निकालाचे महत्त्वाचे अपडेट्स जाहीर केले आहेत. दहावीच्या निकालात यावेळी विभागवार पाहता टक्केवारी घसरली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत सर्वात जास्त लागला आहे. यावर्षी पुन्हा एकदा मुलींनी हुश्शार असल्याचं दाखवून दिलं आहे. मुलींची टक्केवारी 95.87 तर मुलांची टक्केवारी 92.5 इतकी आहे म्हणजेच 3.82 ने कमी झाला आहे.
Maharashtra SSC Result 2023: ‘या’ विभागानं दहावीच्या निकालात यंदाही मारली बाजी; बघा विभागनिहाय आकडेवारीगेल्यावर्षी 10 वी निकाल 96.94 टक्के इतका होता यंदा माञ तोच निकाल 93.83 टक्के इतका लागला, म्हणजे 3 टक्के कमी झाला आहे. 12 वी प्रमाणेच 10 वीचाही निकालाचा टक्का यंदा घटला आहे.
विभागवार निकालाची टक्केवारी पुणे 95.64 नागपूर 92.5 औरंगाबाद 93.23 मुंबई 93.66 कोल्हापूर 96.73
Maharashtra SSC Result 2023: मोठी बातमी! दहावीचा निकाल लागला, जाणून घ्या वैशिष्ट्येअमरावती 93.22 नाशिक 92.22 लातूर 92.67 कोकण 98.11 राज्यातील 43 शाळांचा निकाल शुन्य टक्के एका क्लिकवर बघा निकाल सुरुवातीला https://lokmat.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/ ही लिंक ओपन करा. यानंतर तुम्हाला बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट करायचं आहे. यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे. यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे.